spot_img
spot_img

Latest Posts

I.N.D.I.A आघाडीच्या लोगोचं अनावरण ढकलले पुढे

इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

इंडिया (I.N.D.I.A) आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काही पक्ष नव्याने आलेले आहेत त्यांना ही सहभागी करुन घेतले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत चर्चा होईल, त्यानंतर लोगो फायनल केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचं अनावरण होणार नाही. मुंबईमध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे. या बैठकीसाठी २८ पक्षांचे ६३ प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर दुपारी इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.

इंडिया आघाडीच्या लोगोसाठी नऊ डिझाईन तयार करण्यात आले होते. त्यातील एका डिझाईनला काही महत्त्वाच्या काही प्रमुख पक्षांनी संमती दिली आहे अंतिम झालेल्या लोगोची डिझाईन इंडिया आघाडीतील काही इतर महत्त्वाच्या पक्षांना सुद्धा दाखवून त्यांची संमती घेतली जात आहे. या आघाडीला इंडिया नाव असल्याने या लोगोमध्ये राष्ट्रध्वजाचे तिरंगाची झलक दिसणार आहे. या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या ११ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.या बैठकीत त्या त्या पक्षाचे प्रत्येकी एक प्रमुख नेता समितीचा सदस्य असेल इंडिया आघाडीचे जे काही महत्त्वाचे निर्णय असतील ते या समितीमार्फत घेतले जातील.लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे सर्व लोगो नव्यानं आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावरती अंतिम निर्णय होईल. त्यामुळे तूर्तास आज तरी लोगोचं अनावरण होणार नाही. प्रत्येक पक्षाला आपलं निवडणूक चिन्ह असताना लोगोचे महत्व एवढं वाढवावं का याबद्दल मतमतांतरे आहेत.

लोगो करायचा असेलच तर हा संपूर्ण आघाडीचा असल्यानं त्यावर सगळ्यांचं मत लक्षात घेऊनच निर्णय करावा अशी हालचाल सुरू झाली आहे. काल काही नेते उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्यांशी याबाबत मंथन झालेलं नाही. सोशल माध्यमांवरच्या लढाईत इंडिया आघाडी एकजूट दाखवणार आहे. इंडिया आघाडीची एक कॉमन सोशल मीडिया टीम बनवली जाणार आहे. सोशल माध्यमांवर भूमिकेमध्ये समानता असावी आणि सर्व पक्षांना समान भाव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवक्त्यांमध्ये समन्वयासाठी सुद्धा एक विशेष समिती बनवली जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

एक देश , एक निवडणूक मोदींचा नवा नारा

इंडिया आघाडीचे फोटोसेशन सुरु ,कोण उभे आहेत कोणत्या रांगेत…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss