ऐन विधानसभा निवडणुकीत महायुतीला अजित पवार गटाची नाराजी महागात पडण्याची धाकधूक आहे. याच दरम्यान सरकारने नाराज दादांना थंड करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. शिखर बँक अर्थात महाराष्ट्र्र राज्य सहकारी बँकेत गैरव्यवहार झालाच नाही. सूत गिरण्या आणि साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जामुळे बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असा दावा करत पोलिसांनी विशेष प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच पुन्हा तपास करायचा आहे असं मुंबई पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं. आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे फडणवीस महायुती सरकारसोबत येताच पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलल्याची चर्चा लोकसभा निवडणुकांपूर्वीच होती. मात्र आता विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी कोर्टात नव्याने अर्ज दाखल केला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील विरोध याचिका रद्द करण्याकरिता मुंबई पोलिसांनी कोर्टाकडे हा नव्यानं अर्ज केला आहे. या घोटाळ्यात अजित पवार यांच्यासह ७४ राजकीय नेते आणि पुढारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचं हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून केलेल्या कर्जवाटप आणि वसुलीत २५ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. मात्र, तक्रारदार किसान कानोळे यांना याप्रकरणी विरोध याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा आर्थिक गुन्हे शाखेच्या कोर्टात करण्यात आला आहे. याचिकाकर्ता या प्रकरणाशी कुठेही संबंधित नसल्यानं त्यांची याचिका न सात्विक स्वीकारण्याची विनंती तपास यंत्रणेकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. तसेच गेल्या अनेक दशकांपूर्वीची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येत आहेत, उपलब्ध पुराव्यानुसार कोणताही गैरव्यवहार झाल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे तपास बंद करत असल्याचं सांगत ईओडब्लू कडून दुसऱ्यांदा सी-समरी रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अजित पवारांची भूमिका बदलताच महायुती सरकारची भूमिका बदलली की काय असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव यांच्यासह सुरेंद्र मोहन अरोरा आणि अन्य काही जणांनी तपास यंत्रणेविरोधात प्रोटेस्ट पिटिशन दाखल केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य
Asia Cup 2024 : आशिया कपचा पहिला सामना कुठे आणि केव्हा होणार?, वेळापत्रक जाहीर…