राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत असून त्याच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
एका प्रश्नाच्या उत्तरात बोलताना त्यांनी आवर्जून स्पष्ट केले की,”एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या कोणत्याही योजना मी थांबलेल्या नाहीत. त्यांच्या कामांची चौकशी सुरू झाल्याच्या अफवाही निराधार असून, आमच्यात कोणतेही कोल्डवॉर नाही, उलट वॉरच कोल्ड आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विरोधकांशी आम्ही लढू शकतो माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांमुळे आम्ही माध्यमांशी लढू शकत नाही. त्यामुळे येथे कोणतेही वॉर नसून आम्ही सर्व जण कोल्ड आहोत असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अनेकदा राज्यातील सरकार बाबत खातरजमा न करताच चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत आणि अश्या बातम्या मुळे आमच्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत असेही उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांनी सांगितले.
शिवसेनेचे प्रवक्ता संजय राऊत यांच्या सामना मधील लेखाबद्दल शिंदे आणि पवार यांनी खुलासा केला. पहाटे भेट झाली नसून सकाळी दहा वाजता भेट झाली त्यावेळी तीनही नेते उपस्थित होते, असे या नेत्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर बहिष्कार करून विरोधकांनी सरकारसोबत जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर संवादाची संधी गमावली आहे, अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले आहे. फ्रान्सच्या कंपनीशी केलेल्या कराराबाबत विरोधकांनी भ्रष्टाचाराबाबत न केलेल्या आरोपांवर चुकीच्या बातम्या प्रसारीत केल्या गेल्या असल्याचा खुलासा यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. अधिवेशनात पाच महत्वाची विधेयके प्रस्तावित असून अर्थसंकल्प अभिभाषण आणि महत्वाच्या चर्चा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली. विरोधकांचे संख्याबळ कमी असले तरी त्यांना जनतेचे प्रश्न मांडण्याची पूर्ण संधी देवून त्यावर सरकारकडून उत्तरे देण्यास महायुती सरकार सज्ज असल्याचे ते म्हणाले.
-किशोर आपटे
हे ही वाचा :
Bank Holidays in April 2023, एप्रिल महिन्यात बँका तब्बल १५ दिवस बंद, जाणून घ्या सुट्ट्याची यादी
Chaitra Navratri Sabudana Kheer Recipe, उपवास आहे? तर घरच्या घरी बनवा साबुदाणा खीर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.