महाराष्ट्रात एकीकडे नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशनच (Maharashtra Assembly Winter Session 2024) सुरु आहे. तसेच दुसरीकडे अधिवेशन विविध मुद्द्यांवर गाजत असतानाच तसेच मुंबईमध्ये (Mumbai) मोठी घडामोडी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) त्यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अशी बातमी समोर येत आहे की, संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी करत आहेत. त्या दरम्यान दोन जण संजय राऊत यांच्या घराबाहेर आले. त्यांच्या हातात आठ ते दहा मोबाईल होते. वाहनचालकाच्या हातात मोबाईल होता. तर मागे बसलेल्या व्यक्तीकडे चौरशी पुठ्ठ्यावर अनेक मोबाईल असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलीस तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणावर संजय राऊत याचे बंधु सुनील राऊत यांनी प्रतिकिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, घटनास्थळी झोन सात मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत. सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात आली आहे. जी बाईक होती ती युपी, बिहार असावी, बाबा सिद्धीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच संजय राऊत यांच्या निवासस्थानी रेकी झाल्याचा प्रश्न विधिमंडळात भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, अशा पध्दतीने रेकी केली असेल, सभागृहात हा विषय मांडला असेल, तर जे दोशी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule