spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात; जरांगेची Dhanjay Munde यांच्यावर टीका

मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात अशी टीका केली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज ९ जानेवारीला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळावा म्हणून छत्रपती संभाजी नगरमधील पैठण येथे मोर्चा काढला. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे हे पाप करण्यासाठी ओबीसींचा आसा घेतात, आपली पापं झाकण्यासाठी ते ओबीसींच्या मागे लपतात अशी टीका केली.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुखच्या भावाला धमक्या दिल्यानंतर आपण त्या गुंडाच्या विरोधात बोललो. तर आपल्यावरच केसेस दाखल करण्याचं षडयंत्र केलं जातंय. हे काम धनंजय मुंडे यांच्या लाभार्थीचे काम आहे. तुमच्या लाभार्थी टोळींना आंदोलन करायला लावता , आरोपीच्या मागे उभे राहता, हे चुकीचं नाही का? उद्या तुमच्या आमच्या घरातील कुणी मेले तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? जर आरोपीला साथ द्यायची असं झालं तर राज्यात इतर ठिकाणीही असेच प्रकार घडतील.” सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील एकही आरोपी सुटला तर सरकारची आमच्याशी गाठ आहे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. धनंजय मुंडेंनी जे प्रयोग सुरु केले, षडयंत्र आखलेत, त्यामुळे त्यांचे पाय अजून खोलात जातील. लोकांना सांगितलं जातंय की रास्ता रोको करा, आंदोलन करा, पण यामुळे ते अजूनच जास्त खोलात जात आहेत हे त्यांना समजत नाही.

मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करून म्हणाले की, स्वतःचे पाप झाकण्यासाठी ओबीसींचा आसरा घेतला जात आहे. खून करणार तुम्ही, पाप करणार तुम्ही आणि ओबीसींच्या मागे उभे लपायचं. धनंजय मुंडेंनी पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या टोळ्या आणल्या आहेत. या नासक्या पाच पन्नास लोकांनी त्यांच्या जातीची बदनामी केली आहे.

हे ही वाचा:

महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

पुण्याच्या आयटी कंपनीमधील हत्येचा व्हिडीओ समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss