Thursday, November 30, 2023

Latest Posts

‘ते’ दिल्लीला गेले कारण.. प्रफुल पटेलांनी केला खुलासा

२४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान येथे शिवसेनेच्या दसरा मेळावयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनतर आज २५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. चनक केलेल्या दिल्लीच्या वारीमुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या भेटीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काही मार्ग काढण्यासाठी देखील दिल्ली दौऱ्यावर गेले असावेत. मंत्रिमंडळ विस्तार, काही राजकीय चर्चा, तीन पक्षांशी संबंधित काही बाबींवरील निर्णय अजूनही प्रलंबित आहे. अशा काही बाबतीत चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला गेले असावेत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रात युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. त्यावर पटेल यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र किती मोठा आहे. महाराष्ट्राचा व्याप किती मोठा आहे. महाराष्ट्रातील समस्या काय काय आहेत, हे अजून घेण्यासाठी ही एक चांगली संधी असल्याची प्रतिक्रिया खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

उलट सगळे पक्ष, सत्ताधारी व विरोधक म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले होते, तो विषय हायकोर्टात टिकला होता. मात्र, सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा विषय परत रद्द करण्यात आला. आरक्षणाबाबत न्यायिक मार्ग कसा काढायचा, ही महत्त्वाची बाब आहे. आरक्षण द्यायचं की नाही, हा मुद्दा नाही. आरक्षण लगेच देता येईल पण मुद्दा न्यायपालिकेत नाही टिकला तर, परत कोणत्या समाजाची फसवणूक होता कामा नये. ही महत्वाची बाब असल्याचेही म्हणत मराठा आरक्षणाला कुणाचाही विरोध नसल्याचे प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

Gaza साठी भारत बनला देवदूत, ३८ टन अन्नासह वैद्यकीय उपकरणे…

दसऱ्यानिमित्त Rakhi Sawant चा रावण लूक होतोय व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss