राज्यातील तब्बल २ हजार ३५९ ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत.
आमदार रोहित पवारांना धक्का (Rohit Pawar)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे. कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर आहे. कुंभेफळ आणि खेडगावात भाजपचा सरपंच निवडून आला आहे. तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे.
बुलढाण्यात भाजपच्या डॉ. संजय कुटेंना धक्का (Sanjay Kute)
बुलढाण्यात भाजपच्या डॉ.संजय कुटेंना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली आणि भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. जळगाव जामोद तालुक्यात जामोद ग्रामपंचायत ही भाजपसाठी वर्चस्वाची लढाई होती. मात्र भाजपकडून ही ग्रामपंचायत काढून घेत काँग्रेसने जिंकली आहे. 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या गंगुबाई दामदर विजयी झाल्या आहेत.
खासदार अमोल कोल्हेंना मोठा धक्का
जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार विजयी झाले असून सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.
सांगोला खवासपूर ग्रामपंचायत शेकाप विजयी , शहाजी बापू धक्का (Shahaji Bapu Patil)
सांगोला तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत सरपंच पदी शेकपाचे कोमल सुरेश डोईफोडे विजयी झाले आहेत. सावे ग्रामपंचायत शेकाप विजयी झाले आहेत.
हे ही वाचा :
Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व
Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.