spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्त मुख्यमंत्र्यांच्या तीन प्रमुख घोषणा

आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडवर या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वाच्या घोषणा केल्या. मुंबईमधील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा केली. प्रतापगड स्थापन करण्यात येणार आहे. शिवसृष्टीसाठी ३५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. या सर्व घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

आज रायगडावर शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती त्याचबरोबर शेकडो मंत्री आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी रायगडावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज रायगडावर पारंपरिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला. भगवे झेंडे, आज रायगडावर पताक्यांची सजावट करण्यात आली होती.

सोहळ्यामध्ये भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी नमो कल्याण योजना राबवण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार आहोत. रयतेच्या हक्काचं रक्षण करणार आपलं सरकार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

जे जे रुग्णालयातील Dr Lahane यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिले राजीनामे, नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांची आठवण, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss