Saturday, June 3, 2023

Latest Posts

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

मुंबईसह ठाणे महानगर पालिका आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या कार्यक्रमावर एकंदर आजचा विषय अवलंबलेला आहे. मात्र विशेष बघायला गेलं तर निवडणुकीचा निर्णय अद्यापही लागलेला नाही. हात आलेल्या माहितीनुसार येत्या निवडणूक या ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला या संबंधी निवडणुकीच्या संबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईसह ठाणे महानगर पालिका आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या कार्यक्रमावर एकंदर आजचा विषय अवलंबलेला आहे. मात्र विशेष बघायला गेलं तर निवडणुकीचा निर्णय अद्यापही लागलेला नाही. हात आलेल्या माहितीनुसार येत्या निवडणूक या ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला या संबंधी निवडणुकीच्या संबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. या निवडणुकीचंच निर्णय हा ऑगस्ट महिन्यात हिवणार असल्यामुळे नगरसेवक,ज्येष्ठ नगरसेवक, आणि इच्छुक नगरसेवक तर पक्षप्रमुखानं मध्ये देखील काही अंशी भीतीचे वातावरण पसरलेले बघायला मिळत आहे. नेमक्या निवडणूका नेमक्या कधी घेतल्या जाणार आहे यासंबंधी अजूनदेखील संभ्रम कायम आहे. मुंबई , ठाणे , नवी मुंबई ,कल्याण-डोंबिवली या सारख्या महानगर पालिकेमध्ये बड्या नेत्यांच्या आणि त्यांच्या समीकरणाचा लेखाजोगा ठरलेला असतो. आणि यामुळेच या बड्या नेत्यांना महानगरपालिकेचा निवडणूक कधी होणार असा प्रश्न या नेत्यांच्या मनात सारखा घोंगावताना बघायला मिळतो. निवडणूक पुढे जात असल्याने सामान्य जनतेच्या प्रश्नांना कसे सामोरे जावे लागणार आहे या संबधी गत्यांच्या समोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.

राजकीय पक्षामध्ये निवडणुका कधी घेतल्या जाणार आहे याबाबत तर संभ्रम कायम असणार आहे मात्र हेही असताना राजकीय पक्षातल्या नेमक्या अडचणी काय आहेत आणि आणि जे एकही महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करणारे आपले नगरसेवक वगैरे आहेत त्यांना आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना कसे सामोरे जावे लागत यासंबंधी आपण आज आपल्या मुलाखतीद्वारे त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. आपल्या कडे आलेल्या मान्यवरांबद्दल सांगायचे झाले तर काँग्रेस नेते पक्षाकडून मुंबई महानारपालिकेमध्ये ५ वेळा निवडून येणारे सुरेश कोपरकर आणि भाजपचे ५ वेळा ठाणे महानगरपालिकेमध्ये निवडून यणारे मिलिंद पाटणकर यांच्या सोबत महानगरपालिकेच्या निवडणूका पुढे गेल्यामुळे सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची कशा प्रकारे गोची होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना सामोरे जावे लागते त्याचा एक आढावा घेणार आहोत.

महानगर पालिकेचा प्रवास हा जन्म झालेल्या मुळापासू ते अगदी मृत पावलेल्या व्यक्ती पर्यंत चालत असतो. तरअगदी शाळेमध्ये भरती करण्यापासून ते उत्तीर्ण होई पर्यंतचा प्रवास हा महापालिकेत काम करणाऱ्या नगरसेवकाच्या होती असतो. मात्र आता हाच नगरसेवक काहीसा अडचणीत असलेला बघायला मिळत आहे. त्यामुळे निवडणूक कशी हणार नेमका कोणता पक्ष एकमेकांच्या आमने सामने उभा ठाकणार. किंवा येणाऱ्या राजकारणात निवडणुकांवरून नवीन कोणते समीकरण तयार होणार का ? यासंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाटणकरांना निवडणुकीने संबंधी प्रश्न विचारला असता रवींद्र चव्हाणांनी ठाणे दौऱ्यावर असताना एक मुद्दा सांगितलं की , सत्ताधाऱ्यांची कामे होतात यावर तुमचे काय मत आहे यावर मिलिंद पाटणकर यांनी सांगताना मुद्देसूद उत्तर दिले, ते म्हणाले तेथील स्थानिक नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांकडून तक्रार करण्यात आली होती. आमची विकासाची कामे ही लांबणीवर टाकली जात आहेत. आणि वेळ लागत आहे अशी तक्रार केल्याने ते असे म्हणाले असतील. शेवटी हा skill चा भाग आहे. कारण नगरसेवकांकडे वाटून दिलेला निधी हा कोणत्या कामासाठी किती प्रमाणात वापरला जावा याला skill Development करावी लागते. नगरसेवकाला समजले पाहिजे किनगाव आमदाराला समजले पाहिजे महानगरपालिकेतून फंड कसं मिळवायचा हे त्यांच्या सोबत असलेल्या स्किल्स आणि वाणीतून मिळवायचा असतो. यावेळी त्यांनी त्यांचे स्वतःचे उदाहरण देताना सांगितले की , गेली १ वर्ष मी नगरसेवक नसूनही मी माझ्या वॉर्ड साठी हाती असलेली महत्वाची कामे करून दिली त्यामुळे निधीचा पुरवठा कसा करायचा. हे ठरवता आले पाहिजे. आणि यामधूनच आपण लोकांच्या लक्षात राहतो. आणि केलेल्या कंची पोचपावती म्हणून पुढील काळात येणाऱ्या काळात लोक आपल्यालाच निवडून येतात. हे मिलिंद पाटणकर यांनी ठाम पाने सांगितले. त्यामुळे कामाला प्राधान्य दिले पाहिजे. मोनोपॉली मुद्द्याला हात घातला असता पाटणकर म्हणाले, घराणेशाही न करता पक्ष श्रेष्टींच्या मतावर हे अवलंबलेले असते. परंतु नवीन कार्यकर्त्याला सुद्धा काम केले तर तिकीट मिळू शकते परंतु ते त्या व्यक्तीने ठरवले पाहिजे.

मुंबई महानगर पालिका आणि ठाणे महानगरपालिके या दोन्ही महापालिका महत्वाच्या आहेत. अशा वेळी युती नसताना जर भाजपासाठी किंवा इतर पक्षासाठी लोढणं हा शब्द वापरला जात असेल तर ती स्बशेच चुकीचा आहे हे पाटणकरांनी ठामपणे सांगितले कारण जेव्हा युती नव्हती तेव्हा देखील मिलीं पाटणकर हे ठाणे महानगरपालिकेतून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु प्रादेशाच्या आदेशानुसार जर युती होणार असेल किंवा नसेल तरी आम्ही एकमेकानावर लोढणं नाही आहोत हे ही तितकाच खर मानावं लागेल. ठाणे मतदार संघाच्याबाबतीत विचारले असता लोकप्रतिनिधींकडून किंवा नगरसेवकांच्या माध्यमातून काम करण्यासाठी फंड उपलब्ध करून द्यावा लागतो. मात्र ठाण्याचे मुख्यमंत्री असताना ठाणेकरांना भरपूर प्रमाणात फंड उपलब्ध करून दिला असताना देखील त्याचा ताळमेळ योग्य पद्धतीने का करता येत नाही याबाबत विचारले असता, निधी हा मुख्यतः रस्ते बांधणे , पूल बांधणे, पाण्याच्या टाकी आणि इतर महत्वाच्या कामासाठी हा निधी वापरायचा असतो. यासाठी १२०० कोटी पर्यंत फंड हे उपलब्ध करून दिले आहेत मायंत्र तरी देखील छोट्या कामांसाठी लोक ही लोकप्रतिनिधींकडे जातात. यावेळी तो पूर्णतः आपला कॉल असतो आपण कोणत्या कामांना किती महत्व द्यायचे आणि ठेकेदारासोबत सल्ला मसलत करून हे काम किती कमी निधीत करून घ्यायचे यामध्ये आपल्याला स्वतः निर्णय घयावा लागतो. असे प्रामाणिक मत मिलिंद पाटणकर यांनी मांडले.

ठाण्यातले प्रशासक अभिजित बांगर आणि मुंबईचे प्रशासक इकबाल सिंग चहल हे दोघेही सर्रास अधिकारी आहेत तरी देखील ते लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही का असा सवाल केला असता पाटणकरांनी क्षणाची विलंब न करता आपण आपले प्रश्न, समस्या, या मुद्देसूद सांगितल्यावर अधिकारी वर्ग हा नीट ऐकून देखील घेतो आणि त्यावर तोडगा हा नक्कीचा काढता येतो असे त्यांनी स्पष्ट पणे सांगितले. काही लोक हि जाणून बुजून सुडवृत्तीची देखील असतात त्यावेळी त्यांना आपल्याला हे पटवू देता आले पाहिजे हि हाती घेतलेले काम किती महत्वाचे आहे हे समजल्यास त्यानं निधी हा नक्कीच दिला जातो. नगरसेवकाच्या हाती सही देण्याशिवाय काहीच नसते तरी देखील फक्त प्रभावी बोलण्याने आपण आपली कामे करून घेऊ शकतो असा अनुभव मिलिंद पाटणकर यांनी शेअर केला. निवडून आलेल्या आमदारावर जमादार आहेत म्हणून निवडून आलेले आहे . तरी देखील निवडणूक हा का घेतल्या जात नाहीयेत यावर काही न्यायालयीन कामकाजामुळे अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले आहे. प्रत्येक वेळेस कोर्टबाजीमुळे निवडणुकांचा प्रश्न हा लांबणीवर केला गेला आहे. कोर्ट कचेऱ्यांमुळे निवडणूका लांबल्या हे जरी खरे असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुकांना घाबरले नाहीत . निवडणूक ह्या घेतल्या जाणारच आहे यात काही शंका नाही असे मत मिलिंद पाटणकरांनी सांगितले. आमदारांच्या , खासदारांच्या निधीतून देखील लोकप्रतिनिधी काम करू शकतात फक्त ते काम पटवून सांगितले गेले पाहिजे. आणि नाहीतर स्वतःच्या जोरावर देखील करता आली पाहिजे. तसेच ठेकेदाराला देखील सांगता आले पाहिजे. त्यामुळे निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या skill वर अवलंबलेले असते.

येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक ही ,उद्धव ठाकरेंची महत्वाची असणार आहे, मात्र ठाण्यातील भाजपाबद्दल बोलायचे झाले तर भाजप आत्ताही आहे,आजही आहे आणि उद्याही असणारे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या सोबत युती करून असणारी भाजप आणि एकटी भाजप यवबतीत तुमचे नेमके समीकरण काय आहे याबद्दल तुम्ही काय सांगणार, युतीतून फायदा हा दोघांना होत असतो. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा उच्च आल्याने आणि ठाण्यातील काम बघता त्यांना ठाण्यातून भरघोस प्रमाणात प्रेम देखील मिळते. तर एकनाथ शिंदे याना मिळालेल्या धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावामुळे ठाण्यात आमच्या दोघांचे वर्चस्व टिकून राहील. त्यामुळे मिलिंद पाटणकर यांनी अगदी प्रामाणिकपणे मत दिले.

हे ही वाचा : 

Time Maharashtra Exclusive, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस कसं मांडणार मुंबईत यशाचं गणित?, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले Suresh Koparkar

सरकारला पुन्हा ५०० आणि १००० च्या नोटा चलनात आणाव्या लागणार, डॉ. भालचंद्र मुणगेकर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss