spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पर्यटन मंत्री गिरिश महाजनांनी केली मोठी घोषणा

गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेचचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याच येईल.

गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेचचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याच येईल. या महोत्सवादरम्यान राज्यातील विविध भागातील पर्यटनाशी निगडीत भागधारक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, प्रवासी पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक तसेच वाणिज्य दुतावासाचे प्रतिनिधी यांना आमंत्रित केले जाणार आहे. राज्यात यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे (Internation Ganesh Festival) आयोजन करण्यात येणार आहे. पर्यटनाला (Tourism) चालना देत पारंपारिक कला आणि संस्कृतीची ओळख विदेशातील पर्यटकांना करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं शासनाकडून सांगितलं जात आहे.

१८ ते २८ सप्टेंबर या कालावधीमध्ये मुंबई, पुणे, पालघर आणि रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठई पर्यटन संचालनालयाद्वारे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच गेटवे ऑफ इंडिया इथे श्री गणेशाच्या विविध रुपांच्या विशेष सांस्कृतिक केंद्राची देखील उभारणी करण्यात आली आहे. वाळूशिल्प, मॉझेक आर्ट, स्क्रॉल आर्टचे प्रदर्शन यावेळी भरवण्यात येईल. तर या भागामध्ये देशभक्तीपर यशोगाथा कथन करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यावेळी महाराष्ट्राची पारंपारिक आदिवासी ‘वारली’ संस्कृतीचे दर्शन घडणवारी कार्यशाळा, विविध कारागिरांद्वारे निर्मित हस्तकला वस्तूंचे कलादालन देखील करण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव हा केवळ भव्यतेसाठी आणि मर्यादित स्वरुपात करण्याचा सण नाही. यामुळे आपल्या महाराष्ट्राची कला आणि सांस्कृतिक वारसा तसेच लोकांच्या एकात्मतेचे दर्शन घडवण्याचे एक उत्तम माध्यम तयार होते. आम्ही आपली पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा सादर करण्याचा आणि तो जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत, असं पर्यटन मंत्री गिरिश महाजन म्हणाले. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. त्याचपार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासारख्या शहरांना अनेक विदेशी पर्यटक देखील भेट देत असतात. त्यांना आपल्या परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी शासनाकडून हा सूत्य उपक्रम करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आणखी कोणत्या उत्सवांचे आयोजन या आंतरराष्ट्रीय महोत्सवादरम्यान करण्यात येईल हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा: 

सूर्यवंशी’ नंतर पुन्हा रोहित शेट्टीसोबत करणार काम

मराठवाड्याच्या दुष्काळ परिस्थितीवर जयंत पाटील म्हणाले …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss