Sunday, May 28, 2023

Latest Posts

तुषार भोसले यांनी त्र्यंबक विषयावर केले मोठे वक्तव्य

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी १३ मे रोजी इतर धर्मीय लोकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावरून नवीन वादाला सुरवात झाली.

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी १३ मे रोजी इतर धर्मीय लोकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावरून नवीन वादाला सुरवात झाली. हा चांगलाच वाद निर्माण झाला होता. या वादावरुन आरोप आणि प्रत्यारोप सुरुच आहेत. झाले. अनेक राजकारबानी लोकांनी या अधे उड्या घेतल्या. काही वेळापूर्वीच तुषार भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली.तुषार भोसले हे तेथील पौरोहित्य करतात. त्यांनी काही वेळेपुरती पत्रकार परिषद आयोजित केली होती. आणि यावेळी १३ मे रोजी घडलेली घटना वाचून सांगितली. त्याच वेळेस तुषार भोसले यांनी त्या पत्रकार परिषेदतुन संजय राऊत यांना थेट प्रश्न विचारला आहे.

मी आज आपल्या माध्यमातून संजय राऊत यांना आव्हान देतो की त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांपासून आहे याचे पुरावे संजय राऊत देतील का? असा प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. अन्यथा संजय राऊत यांनी हिंदू धर्म सोडला आहे असंच आम्ही समजू. त्र्यंबकेश्वर गावातल्या लोकांनीही स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे की आमच्या गावात अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हे दाखवून दिलं की स्वार्थी राजकारणासाठी ते इतके लाचार झाले की स्वतःच्या धर्माशी त्यांनी गद्दारी केली. जगातले सर्वात मोठे गद्दार कोण असतील तर ते संजय राऊत आहेत असाही आरोप तुषार भोसले यांनी केला आहे. हळूहळू मंदिरात शिरायचं, परंपरा दाखवायची, व्हिडीओ रेकॉर्ड करुन पुरावे तयार करुन ठेवायचे. आजपासून ३०-४० वर्षांनी दावा करायचा की या मंदिरामध्ये आमची जागा आहे. आमचे पूर्वज धूप दाखवत आले आहेत. हेच आत्तापर्यंत हिंदू समाजाने सहन केलं आहे. आता हिंदू समाज रिस्क घेणार नाही. त्यामुळे माननीय गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे जे पुरावे आहेत ते मी एसआयटीकडे देणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने एसआयटीला हे सांगितलं आहे की आमच्या मंदिरात धूप दाखवण्याची अशी कुठलीही परंपरा नाही.असेही यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर सांगितले.

संजय राऊत यांना मंदिर समितीवर विश्वास नाही का? असाही प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. जे लोक उरुसमध्ये सहभागी झाले होते त्यातले कोण कोण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत याची माहिती माझ्याकडे आली आहे. मात्र ती माहिती मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीला देणार आहे. असे मोठे वक्तव्य तुषार भोसले यांनी केले आहे, त्या उद्धव ठाकरेंच्या संजय राऊत यांना माझा प्रश्न आहे की आयएसआयच्या एजंटला लाजवेल इतकं घाणेरडं कृत्य संजय राऊत यांनी केलं आहे. हिंदू धर्माच्या विरोधातल्या लोकांना बळ देण्याचं काम केलं आहे. संजय राऊत जिहाद्यांचे एजंट आहेत का? असाही प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. संजय राऊत यांचा स्वतःच्या धर्मातल्या लोकांवर विश्वास नाही, मंदिर समितीवर विश्वास नाही असंही भोसले यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

म्हाडाच्या घराच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण; त्वरित भरा फॉर्म

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss