Friday, April 19, 2024

Latest Posts

तुषार भोसलेंचे संजय राऊतांना आव्हान, राऊतांनी हिंदू समाजाची माफी मागावी

आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्ष जुनी आहे असे सांगितले यावर संजय राऊत यांनी सकाळ हिंदू समाजाची माफी मागावी

आज सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्ष जुनी आहे असे सांगितले यावर संजय राऊत यांनी सकाळ हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी तुषार भोसले केली आहे तुषार भोसले यांनी संजय राऊत यांना आव्हान केले आहे संजय राऊतांनी सिद्ध करून दाखवावे की त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा ही १०० वर्ष पूर्वीची परंपरा आहे.

संजय राऊत हे हिंदूच नाही अशी टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राऊतांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला याच पार्श्वभूमीवर त्र्यंबक (Trimbakeshwer) नगरीमध्ये आलो, पुरोहितांशी चर्चा केली. मंदिर व्यवस्थापन मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा केली. यावरून संदलची मंदिराला धूप दाखवण्याची कोणतीही प्रथा परंपरा त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये नाही. मग संजय राऊत याना ही परंपरा असल्याचा साक्षात्कार कोणी दिला असा प्रश्न तुषार भोसले यांनी केला आहे.

पुढे तुषार भोसले म्हणाले की, आम्ही अनेक दिवसांपासून सांगत होतो की उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडले आहे. एवढेच नाही संजय राऊत यांनी तर हिंदू धर्म सुद्धा सोडल्याच्या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे असे तुषार भोसले म्हणाले. धूप दाखवण्याची १०० वर्ष जुनी परंपरा आहे हे संजय राऊतांनी पुरावा दाखवून सिद्ध करावे असं आव्हान भोसले यांनी दिले आहे. जर जसे नसल्यास राऊत यांनी हिंदू समाजाची माफी मागावी आणि त्यांच्यावर हिंदू समाजाचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. जर ४८ तासामध्ये हिंदू धर्मियांची माफी मागितली नाही तर ४८ तासानंतर त्यांचे गंभीर प्राणिमान भोगावे लागतील असा इशारा तुषार भोसले यांनी संजय राऊतांना दिला आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss