शिंदे-फडणवीसांच्या काळात राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या आरोपांना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. उद्योग विश्वामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण करणाऱ्या सचिन वाझेच्या मागे ठाकरे उभे होते, त्यांच्यामुळेच उद्योगांसाठी सुरक्षित अशी असलेली मुंबईची प्रतिमाही डागाळली असल्याचा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागावी असंही ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले उद्योगमंत्री उदय सामंत?
वेदांत फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि बल्क ड्रग पार्क यांसारख्या मोठ्या उद्योगांना महाराष्ट्राबाहेर जाण्यास ठाकरे सरकार जबाबदार आहे.
सन २०२० साली कोठडीतील आरोपीच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार धरून पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यास सांगितल्याची माहिती आहे.
त्यानंतर, वाझे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबाच्या निवासस्थानाखाली जिलेटिनच्या कांड्या आणि स्फोटकांनी भरलेली कार लावली. खासदार संजय राऊत (महाविकास आघाडी सरकारचे निर्माते) मार्च २००१ यांनी वाझेची पाठराखण केली आणि त्याला प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं सांगितलं आहे.
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .