RSS Leader Bhaiyyaji Joshi on Mumbai’s Language : मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी घाटकोपर येथील एका कार्यक्रमात मुंबईच्या भाषिक वैशिष्ट्यावर बोलत होते. पण बोलताना ते असे काही बोलून गेले की, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजप सरकार आल्यापासून मुंबई तोडण्याची भाषा होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी आज मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे वक्तव्य संघाचे भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांची तुलना अनाजी पंत यांच्यासोबत करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
आज विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी विधीमंडळ परिसरात उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना मराठीच्या मु्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, काल महायुतीचे आमदार ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. दुर्देवाने आमदार तिकडे छावा पाहताना इकडं आजच्या काळातील अनाजी पंत यांनी मराठी-अमराठी असं विष कालवून गेले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. पण राज्यात फूट पाडणारे औरंगजेब आणि त्याला मदत करणारे अनाजी पंत जन्माला आलेत आणि येत आहेत हे दु्र्दैव असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.पुढे बोलतांना, ब्रह्मदेवांना आपणच जन्म दिला असा काहींचा अविर्भाव असतो आणि जगभर ज्ञान वाटत फिरतात. अश्याच एका अनाजी पंतांनी मुंबईत येऊन मुंबईत मराठी यायला हवं असं काही नाही, हे सांगून गेले. हा संघाचा छुपा अजेंडा आहे, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ‘बटेंगे ते कटेंगे’ म्हणतात. त्या ‘बटेंगे ते कटेंगे’चा अर्थ म्हणजे हिंदू-मुस्लीम नाही. मराठी -अमराठी आणि मराठा आणि अमराठा असा आहे. ते असा द्वेष निर्माण करुन वाटणी करणार आहे. मराठी-अमराठी असा वाद लावला जात आहे. या आजच्या अनाजी पतांनी केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमध्ये अशी भाषा करावी आणि सुखरुपपणे यावे असे आव्हान ठाकरे यांनी दिले.
मराठी माणसाला संघ खिजगणतीत धरत नाही असे दिसून येत आहे. देशात भाषावार प्रांत रचना झाली आहे. आता ही मंडळी मुंबईची भाषावर गल्लीरचना करत असून ही घाणेरडी, विकृती असल्याचा हल्लाबोल ठाकरे यांनी केला. सरकारकडून थातूरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईकर म्हणून शहरावरील संकटाला सामोरे जातो. तु्म्ही वाद लावून पळून जाता. या शहरामध्ये, राज्यामध्ये विविध घटकांमध्ये आपलेपणा आहे. या आपलेपणात तुम्ही साखरेचा खडा टाकणार नसाल तर मिठाचा, द्वेषाचा खडा टाकू नका असेही ठाकरे यांनी भैय्याजी जोशींना सुनावले.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार