spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

अमित शाह यांना उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान; जय शाह यांनी गावातील तरुणाची काढावी विकेट

Uddhav Thackeary Rally : आमच्या गावातील तरुण जय शाह यांच्यापेक्षा चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावामधील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहित नाही विराट कोहलीचा त्यांनी विक्रम मोडला नाही? पण त्यांना अध्यक्ष का केले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरु केला आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्या सभा होत आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या प्रचारातून राज्यामधील सरकारला निशाणा साधत आहे. तसेच ते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर देखील जोरदार हल्ले करत आहेत. त्यांनी आता अमित शाह यांचा मुलगा जय शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बीसीसीआयचे अध्यक्षपद जय शाह यांना कोणत्या निष्कषावर दिले आहे? उद्धव ठाकरे यांनी असा प्रश्न विचारला? उद्धव ठाकरे हे नांदेड जिह्ल्यातील लोहा कंधारमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

महिलांना तीन हजार रुपये देणार
आमचे सरकार आल्यावरती आम्ही महिलांना दीड हजार नाही तर आता तीन हजार रुपये देणार आहे. तसेच महिलांची पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर नियुक्ती करणार आहे. यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल. आम्ही मुलींच्या शिक्षणानं बरोबर मुलांचं शिक्षणही मोफत देणार आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले होते, आणि आताही अर्ज मुक्त केले असते. परंतु त्यांनी आमचे सरकार पाडले. महायुती ठेकेदारांची पोट भरत आहे. तयामुळे आम्हाला तो विकास नको आहे.

जय शाह यांच्यावर हल्ला
देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही वेळापूर्वी म्हंटले होते की, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे आहे. मात्र मी अमित शाह यांना विचारतो, क्रिकेटमधील काही जय शाह यांना माहित आहे का? मी आव्हान देतो की, जय शाह यांनी गावातील तरुणांची विकेट काढून दाखवावी, आणि मग बीसीसीआय नाही तर त्यांना कुठेही अध्यक्ष करा, यामध्ये माझा विरोध असणार नाही.

हे ही वाचा:

मोदींच्या सभेत रामदास आठवलेंची कवितेतून जोरदार फटकेबाजी, पंतप्रधान आहे पळणारा चित्ता…

PM Narendra Modi LIVE: शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की… अकोल्यातून पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss