Friday, June 2, 2023

Latest Posts

Uddhav Thackeray Sabha Live, आपणच शिवसेना असा गैरसमज काहींचा झालाय

आज दिनांक ६ मी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर होते.

Uddhav Thackeray In Mahad, आज दिनांक ६ मी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरे आज रिफायनरी विरोधकांची भेट देखील घेतली आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील पार पडत आहे. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी चांगलाच हल्लाबोल हा केला आहे.

आज बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणले आहे शिवसेना संपली पाहिजे असे काहींना वाटत आहे. आपणच शिवसेना असा गैरसमज काहींचा झाला आहे . आज मी केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच नाव घेऊन तुमच्या समोर आलो आहे. बाकी माझ्याकडे काही नाही तरी देखील तुम्ही इतक्या संख्येने आला आहात. माझ्यावर टीका केल्याशिवाय काहींना घास उतरत नाही. आमच्या सभांना मैदान कमी पडत आहे. धनुष्यबाण चोरला, पक्षाचं नाव चोरलं. हे मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजल्या शिवाय रनर नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आहेत की, स्नेहल ताई आणि जगताप कुटुंबिय काँग्रेसमधून आल्या. काही जणांच्या भुवया उंचावल्या. काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला. पुढच्या निवडणुकीत डिपॉझिट शंभर नाही एक लाख टक्के जप्त मग आता कसं होणार? काँग्रेसमधून शिवसेनेत आले, शिवसैनिकाचं काय होणार? अरे काय होणार काय? गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावर चढवला. तसं आपण काही करत नाही आहोत. आपण त्यांना काहीही न देता ते आपल्याकडे आले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, काहींनी गद्दारी केली, भाजपने फुस लावली. भाजपने नीच डाव केला चिन्ह पक्ष चोरून त्यांना दिला. मी फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव वगळता माझ्याकडे काहीच नाही. अजून काही लोक सोबत येणार आहे. मविआ म्हणून सोबत आहोत. विधानपरिषद निवडणुकीत अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार शिवसैनिक. असे एकजुटीने लढल्याशिवाय भाजपचा पराभव होणार नाही.

आज सकाळी बारसू ला जाऊन आलो. पण विशेष म्हणजे हा महाड मतदार संघ हा शिवसेनेचा आहे. गद्दारांनी पाठीत वार केला असा देखील हल्लाबोल हा उद्धव ठाकरेंनी केला आहे. भगव्याला कलंक लावणाऱ्याला मातीत गाडणार असा देखील हल्लबोल हा उद्धव ठाकरेंनी केला आहे आहे. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले आहे की, सत्ता असते त्या ठिकाणी लोक जातात. आज माझ्याकडे सत्तादेखील नाही. भाजपने नीच डाव साधत पक्षाचं नाव, निवडणूक चिन्हं त्यांना दिले आहे. माझ्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाशिवाय काहीच नाही. तरीदेखील अनेकजण पक्षात येत आहेत…याचं आश्चर्य वाटत आहे. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. जो पर्यंत माझा कोकणी बांधव हा प्रकल्पा साठी तयार होत नाही तो पर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही. बारसूमध्ये सगळीकडे पोलीस आहेत घरात पोलीस, गच्चीवर पोलीस. एवढा बंदोबस्त सीमेवर लावला असता तर चीन घुसला नसता. कोकणी बांधवाच्या मनाविरोधात प्रकल्प रेटवणार असाल तर संघर्ष करू नका सगळा महाराष्ट्र बारसूमध्ये आणू असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला आहे. तुम्हाला कोकणच्या भरभराटीसाठी हा प्रकल्प आणायचा असेल तर त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे. हे सर्व खोके घेऊन मोकळे झाले, नसुन भूमिपुत्रांना का मारतात असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

लाचार हे कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची भांडी घासायला गेले आहेत असं म्हणतं उद्धव ठाकरेंनी चांगलाच हल्लाबोल हा केला आहे. तसेच उद्धव ठाकरे पुढे नरेंद्र मोदींवर देखील हल्लाबोल हा केला आहे. १०० वेळा बोलत पण लोकांच्या मन की बात कुठंय? बजरंग ब्लीच नाव घेऊन मतदान करण्याचं मोदींनी आवाहन केले आहे. मोदींनी केलेला हा धार्मिक प्रचार नाही का ? असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप करतात, कुटुंबाला बदनाम करतात. तसेच पुढे उद्धव ठाकरे यांनी राणेंवर देखील नाव न घेता टीका केली आहे आणि म्हणाले आहेत की, एकावर दोन फ्री. तसेच ते पुढे ,म्हणाले आहेत की, तळये गावांच्या कटु आठवणींचा संदर्भ आणि विचारपूस. तळये गावाचे पुनर्वसनाचे आदेश दिले, पण अद्याप किती लोकांना घर मिळाली. सरकारी आकडेवारीचा संदर्भ. दोन वर्षात फक्त १५ घरे दिली. पत्रकारांनी माहिती घ्यावी. हे चुकीचे असेल तर आनंद. इथल्या आमदाराला असा घाम फोडायचाय की नॅपकिन कमी पडेल. दोन वर्ष होत आलीत मग जनतेचे पुनर्वसन का नाही. मुख्यमंत्री सुरत गुवाहटी दिल्लीला जातात इकडे आले होते का? बोम्मई पुन्हा बरळले. अनेक वर्ष तिथे भाषिक अत्याचार सुरु आहे पण आमचे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार म्हणतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कानडीत जाहीरात करतात. मिंधेंध्ये हिंमत असेल तर पत्रकार परिषद घ्यायला हवी तिथे असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

निवडणुकीत जनतेची मते मांडायला हवी. पण हे मन की बात करतात. २०१४ साली दिलेले आश्वासन काय होती? त्यावर कोणी विचारले की तुरूंगात टाकायचे. जातीय दंगली घडाव्यात. अवाजवी आश्वासने द्यायची सोन्यासारखे तुम्ही मत देता. वाद लावायचे. शिवसेनाप्रमुखांचा मतदानाचा अधिकार काढला याची आठवण. आज पंतप्रधान म्हणतायत मतदारांना बजरंगबलीचे म्हणा मग तुमचे बळ,५६ इंच छाती कुठे आहे? यापुढील प्रत्येक निवडणुकीत जय भवानी जय शिवाजी म्हणून भाजपला तडीपार करा. सत्यपाल मलिकांच्या मुलाखतीचा संदर्भ. सैनिकांचा उपयोग भाजपने स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी केला. विमाने दिली नाहीत ४० लोक गेलीत आणि हे मते मागत होते. असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत

भारत माता की जय म्हटले तो देशप्रेमी होत नाही. सैनिकाकडे बुलेट जनतेकडे बॅलेट. सत्यपाल मलिकांकडे सीबीआय. इतर पक्षातील लोकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा. प्रियंका गांधींकडून मोदींना जोरदार प्रत्युत्तर. इकडे एक आहे एकावर दोन फ्री. त्याला काय कळवावे समजत नाही. दोन पोर सांभाळायची तर डोक्यावरचा टोप जाईल. माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत कारण तुम्ही सर्व माझे नातेवाईक आहेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आहेत कि, मी हिंदुत्व सोडले असा एक प्रसंग सांगा. हिंदुत्व काय हे मला प्रबोधकार शिवसेनाप्रमुखांनी सांगितलय. भाजपचे हिंदुत्व काय आहे? गोमूत्रधारी. मेहबूबा मुफ्ती सोबत बसले तुम्ही काय सोडले? भागवत मशिदीत गेले मी काही बोललो. कश्मीरातील सैनिक औरंगजेबाच्या हौतत्म्याची आठवण. देशासाठी लढणारा आमचा, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. भाजपने भ्रष्टाचार, हिंदुत्वावर बोलण्याची लायकी नाही. बीजेपी आता भ्रष्ट जनता पार्टी झालीय. मेघालयात अमित शहांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच सोबत सरकार स्थापन केले. पण साध्या माणसांवर धाडी टाकताय. कुठे आहे हिंदुत्व ? कुटुंब उदध्वस्त करायचे. मोदी व्यक्ती विरोधात नाही वृत्ती विरोधात मी आहे. देशातले तेज आपल्या महाराष्ट्रात जन्मले शिवाजी महाराज. चवदार तळ्यावरचे वाक्य मानवी अधिकरांसाठी आठवण आहे.

आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. माझं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. मेहबुबा मुफ्तीनसोबत युती केली तेव्हा भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं? असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केला आहे. पक्ष म्हणजे फक्त चिन्ह आणि नाव नाही. तो विचार असतो. निवडणुका येतील जातील. पण २०२४ साली आपण ही वृत्ती गाडली नाही तर लोकशाही संपेल.नड्डांच्या विधानाची आठवण. तुमच्यात हिंमत असेल तर सगळ्या निवडणुका एकत्र लावा. तुम्ही तुमच्या मोदींच नाव घेऊन मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन येतो. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या मी धगधगती मशाल घेऊन येतो असं म्हणत शिंदे गटाला आवाहन हे उद्धव ठाकरेंनी दिले आहे. उद्याच येणार सरकार हे आपलं आणि जनतेचं आहे. शिवसैनिकांना पेटवण्याचा प्रयत्न करू नका. लोक मला कुटुंबातील मानतात हीच माझी मोठी कमाई आहे . मी माझी पातळी सोडली नाही मला तशी गरज नाही. काहीही हातात नसतांना जमलेले आशीर्वाद माझ्यासाठी खूप आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी कसा होतो हे जगजाहीर. मला लिहण्याची सांगण्याची गरज नाही. तुम्ही शपथ घ्या भगवा कायम फडकत ठेवा. मी तुम्हाला राज्यात भगवा फडकवून दाखवतो. असं देखील उद्धव ठाकरे म्हणले आहेत.

हे ही वाचा : 

पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या, वाहतूक कोंडीत जगात 6 व्या क्रमांकावर

CSKvsPBKS, एम एस धोनी आणि शिखर धवन आमनेसामने

“मन की बात” या कार्यक्रमाचा १०० व्या भागामध्ये पंतप्रधान मोदी भावुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss