शासन आपल्या दारी, पोलिस आपल्या घरी, असं सध्या सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या विषयामुळे महाराष्ट्रात आंदोलन सुरु असतांना उपमुख्यमंत्री दौऱ्यावर गेले आहेत. मराठा आरक्षणाचा विषय चिघळत चालला आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल जो निर्णय घेण्यात आला, त्यावर मला बोलायचं आहे. सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. तीच लोकशाही धोक्यात असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करतंय, याकडे लोकांचं लक्ष असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जे अपात्र होणार आहेत, ते राजीनामा देत आहेत. आमदार आणि खासदारांना राजीनामा दिला तरीही त्यांना काही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मेरी माटी , मेरा देश’ अशी जाहिरात करत आहेत. पण देशातील माणसांनाच किंमत नसेल तर त्या जाहिरातीला काही अर्थ नाही. तिथे मणिपूर जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय. नोंदी फक्त भाषण करून जातात. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनाबद्दल त्यांची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. आरक्षणाच्या मुद्यावरून सगळ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालं आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात यावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला घेऊन हिंसक आंदोलन होत आहे आणि इकडे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नसतात. दसरा मेळाव्याला मी मराठा आरक्षणावर बोललो आहे. त्यावर अजूनही मार्ग निघाला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक घेतली. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर होते. एका उपमुख्यमंत्रीला डेंग्यू झालाय आणि दुसरे पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले होते. स्वराज्य जळत असताना यांना प्रचार महत्त्वाचा वाटतो का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
हे ही वाचा :
कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा