Thursday, April 25, 2024

Latest Posts

उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी – नितेश राणे

महाराष्ट्रात सध्या चालू काय आहे असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे.महाराष्ट्रात सत्ता प्रश्न आणि लोकांच्या समस्यांकडे लक्ष कमी तर नको त्या गोष्टींकडे लक्ष जास्त दिले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लहान-मोठ्या दंगली उसळल्याचं पाहायला मिळालं

महाराष्ट्रात सध्या चालू काय आहे असा प्रश्न आता लोकांना पडलेला आहे.महाराष्ट्रात सत्ता प्रश्न आणि लोकांच्या समस्यांकडे लक्ष कमी तर नको त्या गोष्टींकडे लक्ष जास्त दिले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये लहान-मोठ्या दंगली उसळल्याचं पाहायला मिळालं. राम नवमीच्या दिवशी राज्यात तीन- चार ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटांमध्ये राडा झाला. या राड्याचं रुपांतर दंगलीत झालं. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. तसेच दंगलखोरांनी काही दुचाकी आणि चारचाकी वाहनंही पेटवली. या घटनेत दोन्ही गटांमधील १० जणांसह दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले. यानंतर अहमदनगरच्या शेवगाव शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रात्री निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजात आक्षेपार्ह घोषणांमुळे राडा झाला. त्यानंतर दगडफेक व जाळपोळ करण्यात आली. या दंगलींवरून सध्याचं राजकारणात राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करता दिसत आहेत. त्याचबरोबर असले प्रकार हे विरोधकांकडून कारण्यात येत
आहे असे जातावले जात आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दंगलींप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. अजित पवार यांनी मागणीची जशी घोषणा प्रसारमाध्यमांच्या साहाय्याने केली यानंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या दंगलींवरून गंभीर आरोप केले आहेत. नितेश राणे म्हणाले, विरोधी पक्षनेते अजित दादांनी सांगितलं, या दंगलींचा मास्टमाईंड शोधा. मी दादांना सांगेन या दंगली होतायत त्याचा मास्टरमाईंड तुमच्या सिल्व्हर ओकवर (शरद पवार यांचं निवासस्थान) काही दिवसांपूर्वी आला होता. तुमच्यासोबत बसलेला. पवार साहेबांच्या बाजूच्या सोफ्यावर बसलेला. त्याचा पत्ता कलानगरमध्ये आहे. अशा खोच टीका नाव ना घेता करण्यात आली आहे. त्यामुळे आता नितेश राणे आणि अजित पवार याचे हेवेदाव्यांचे समीकरण बघायला मिळत आहे.

तसेच नितेश राणे यांनी कोणता हि मागचा पुढचा विचार न करता त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या दंगलींचे सूत्रधार हे उद्धव ठाकरे असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. कारण उद्धव ठाकरेंचं मातोश्री हे निवासस्थान वांद्रे येथील कलानगरमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर गेले होते. तिथे ते अजित पवारांच्या शेजारी बसले होते असे आमदार नितेश राणे म्हणाले, त्याचबरोबर नितेश राणे यांच्याकडून सतत उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता राजकारणात नितेश राणे अजून किती प्रमाणात ठाकरे गटावर ताशेरे उधळणार आहे हे पाहणे गरजेचे झाले आहे.

हे ही वाचा : 

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

देवेंद्र फडणवीसांकडून त्र्यंबक प्रकरणावरून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss