spot_img
Wednesday, March 19, 2025

Latest Posts

Uddhav Thackeray : पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी खासदार व आमदारांच्या महत्त्वपूर्ण बैठक

आता ठाकरे गटात होणाऱ्या पक्ष गळतीकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटातील खासदारांची येत्या २० फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. तर, आमदारांची २५ फेब्रुवारीला ठरवण्यात आली आहे. या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे खासदार-आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Uddhav Thakceray : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार माजी आमदार राजन साळवी यांनी मागच्या शुक्रवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता चिपळूणचे आमदार भास्कर जाधव यांनी क्षमतेनुसार आपल्याला संधी मिळाली नाही, आपल्याला जर वेळीच योग्य संधी मिल्लई असती तर आज भास्कर नावाप्रामणेच भास्कर म्हणून पाहायला मिळाला असता, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सध्या सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर सुरु आहे.अशातच, ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांची आभार सभा झाली. त्यावेळी कोकणातील ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. आता कोकणात ठाकरे गटाकडे भास्कर जाधव यांच्या रुपाने फक्त एकमेव आमदार उरला आहे. माजी आमदार राजन साळवी यांनी मागच्या शुक्रवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर आता चिपळूणचे आमदार भास्कर जाधव सुद्धा ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. भास्कर जाधव यांची खंत दूर करण्यासाठी ठाकरे गटातील नेत्यांनी त्यांच्यासोबत एक बैठक करुन मन वळवण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आता ठाकरे गटात होणाऱ्या पक्ष गळतीकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटातील खासदारांची येत्या २० फेब्रुवारीला बैठक आयोजित केली आहे. तर, आमदारांची २५ फेब्रुवारीला ठरवण्यात आली आहे. या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे खासदार-आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षातील अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी बोलवली आमदार खासदारांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती.

फक्त कोकणच नाही, राज्यभरातील ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहे. विधानसभा निवडणूक २०२४ च्या निकालानंतर हे प्रमाण वाढलं आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ५७ जागांवर विजय मिळवला, तेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाला फक्त २० जागा मिळाल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेनाच खरी असे म्हटले जात आहे.

Latest Posts

Don't Miss