सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठं मोठ्या उलथापालथी या होत आहेत. काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांनी राष्ट्रवादी मधून काढता पाय घेतला आणि शिंदे फडणवीस सरकारसोबत एकत्रित झाले. अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचा इतर काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीनंतर पक्षात अनेक मोठंमोठ्या घडामोडी या घडल्या आहेत. राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis) शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पक्षात पडले आहे. राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी होणार आहे.
आजपासून निवडणूक आयोगात (Election Commission) राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत (NCP Crisis) सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगात (Election Commission) होणाऱ्या या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला रवाना झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) आज सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडे या सुनावणीसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणीसाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आज दोन्ही गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनावणीला आमनेसामने येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सलग तिसऱ्या सुनावणीत खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे तीन महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे.
हे ही वाचा:
IND vs WI 4th T-20 – टीम इंडियासमोर मालिका जिंकण्याचे आव्हान
प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट