राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना झाला होता. पण शिवसेना उबाठा पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळेच निवडणूक निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. तर विधानसभेचा निकाल महाराष्ट्रातील जनतेला मान्य आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर ईव्हीएमच्या घोळावरून संशयही व्यक्त केला आहे. आता सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांची बैठक मुंबईत होत असून गटनेता व सभागृह नेत्यांची निवड केली जात आहे. आज दि. २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे शिवसेना उबाठा पक्षांच्या नवनिर्वाचित २० आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उबाठा पक्षाचा प्रतोद, गटनेता आणि सभागृह नेत्यांची निवड करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेना नेते या आमदार आदित्य ठाकरे विधिमंडळ सभागृह नेता बनले आहेत. तर भास्कर जाधव यांच्याकडे शिवसेना गटनेता पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे विश्वासू आणि निकटवर्तीय आमदार सुनील प्रभू यांच्याकडे प्रतोप पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना उबाठा गटातील निर्णय होतील.
राज्यात भाजप महायुतीतील २३६ जागांवर बहुमत मिळालं असून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना शिंदे गटानेही ५७ जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जेवढे आमदार एकनाथ शिंदेसोबत गेले होते त्यापेक्षा जास्त आमदार आता विजयी झाले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे २० आमदार निवडून आले आहेत.
हे ही वाचा:
Vanchit नक्की कोणाला पाठिंबा देणार? Mahayuti की Mahavikas Aghadi? | Prakash Ambedkar | VBA | MVA
Follow Us