संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात चांगलाच वातावरण तापला आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनी सुरवातीपासून आपली भूमिका मांडली. आता त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वागत सत्कार स्वीकारणार नाही, अशी भूमिका भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती आणि भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव येथे आयोजित सत्कार समारंभात सुरेश धस बोलत होते. यावेळी भाजप आमदार सुरेश धस हे कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित होते, मात्र त्यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.
संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी झाली होती हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं होतं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. डोणगावच्या टोलनाक्यावर अचानक एका चारचाकी गाडीकडून संतोष देशमुख यांच्या गाडीला अडवण्यात आलं होतं. त्या गाडीतून 5 ते 6 तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करु लागले. त्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली ओढून काठ्या, लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांच्या गाडीत टाकून घेऊन गेले. त्यानंतर देशमुखांची आरोपींनी हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेवरुन राजकी वातावरण चांगलच तापलं आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलच लावून धरलं आहे.
Follow Us