बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आज एक महिना झाला आहे. हत्या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे तर एक आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा पोलिसांच्या शरण आला. जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, प्रतिक घुले, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनावणे हे आरोपी अटकेत आहेत. तर आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. घटनेचा तपास CID आणि SIT कडून सुरु आहे. तपासात स्थानिक गुन्हे शाखा देखील सहभागी आहे. आता वाल्मिक कराडच्या प्रकृतीबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
खंडणीच्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा नऊ दिवसांपासून बीडच्या सीआयडी कोठडीत आहे. वाल्मिक कराड आजारी पडला आहे. वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी त्याला डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप दिले आहेत. CID कडून आज त्याचा व्हॉईस सॅम्पल घेण्याची शक्यता आहे. व्हाईस सॅम्पल जुळल्यानंतर वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होईल.
रिपाई आक्रमक
चार दिवसात हत्येचे स्पष्टीकरण द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाई आक्रमक झाले आहेत. हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी रिपाई आठवले गटाकडून कंकालेश्वर मंदिरात साकडे घातले आहे.
ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन
सरपंच संतोष देशमुख यांचीहत्येला आज तीस दिवस झाले. आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अनेक ग्रामीण भागातील गरमपंचायती आज बंद आहेत. बीड जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ अशा अनेक ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आज बंद आहेत. त्यामुळे कामकाज बंद व ग्रामपंचायतीला कुलूप दिसत आहे. सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्यांनी बंदची हाक अनेक ठिकाणी दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभर ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो