spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

शेतकऱ्यांची फसवणूक वाल्मिक कराडच्या केल्याचं समोर: शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितली आपबिती

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडचे अनेक काळे कारनामे समोर येत आहेत. आता वाल्मिक कराडने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील फसवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंढरपूरमध्ये वाल्मिक कराडकडे काही शेतकऱ्यांनी ऊस हार्वेस्टिंग करणाऱ्या म्हशींसाठी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याची माहिती समोर आली होती. शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी त्याने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ-आठ लाख रूपये घेतली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामतीतील शेतकऱ्यांनी गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. भेट घेऊन परळीतील वाल्मिक कराड यांने ऊसतोडणी यंत्र अनुदानाच्या आमिषाने फसवणूक केल्याचं सुप्रिया सुळे यांना सांगितलं. हार्वेस्टर घेतलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी वाल्मिक कराडने प्रत्येकी शेतकऱ्यांकडून आठ-आठ लाख रुपये घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, या शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही त्याचबरोबर पैसेही परत केले नाहीत, अशी तक्रार फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी काल सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन केली.

सुप्रिया सुळेंनी पोलीस अधीक्षकला केलं फोन
शेतकऱ्यांनी सर्व घटना सांगितल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना फोन केला. त्यांना या प्रकरणाची चौकशी करत शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी देखील केली. केंद्र सरकारच्या वतीने ऊसतोडणी मशिनसाठी देण्यात येणारे 40 टक्के अनुदान मिळवून देतो, असे सांगून वाल्मिक कराड याने ही फसवणूक केली असल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बारामती तालुक्यातील तरडोली येथील शेतकरी व हार्वेस्टर मालक रामचंद्र विठ्ठल भोसले यांनी या फसवणूक प्रकरणाची माहिती खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर माध्यमांना दिली. भोसले यांच्या म्हणण्यानुसार, मुंडे यांचे कराड हे निकटवतीय असून, ते तुम्हाला प्रत्येकी ३६ लाख रुपये अनुदान मिळवून देतील, त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगण्यात आले होते. पैसे दिल्यानंतर शेतकरी अनुदान कधी मिळणार याची कराडकडे चौकशी करत होते. प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात होईल, अशी आश्वासने वाल्मिक कराडकडून वारंवार देण्यात येत होती, अशी माहिती देखील त्यांनी खा. सुप्रिया सुळेंना दिली आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss