बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली हाती. या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात वातावरण तापले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून १ आरोपी अद्याप फरार आहे. मंत्री धनंजय देशमुख यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला देखील अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वाल्मिक कराडचा पाय आता आणखी खोलात फसला आहे. हे सर्व सुरु असताना आता वाल्मिक कराड याची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात काम करणाऱ्या सालगड्यानं गंभीर आरोप केला आहे.
वाल्मीक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शिंदे माने हे कुटुंब ज्योती जाधव यांच्या शेतात काम करतं, मात्र या कुटुंबाला गेल्या तीन महिन्यांपासून मजुरीच न मिळाल्याचा आरोप शिंदे माने कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
गेल्या सात महिन्यापासून हे कुटुंब वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या शेतात काम करते. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ज्योती मंगल जाधव यांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नसल्याचा दावा या कुटुंबानं केला आहे. त्यामुळे आता या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हे कुटुंब गेल्या तीन महिन्यांपासून मुलांना मिळणाऱ्या शाळेतील तांदुळावर आपली भूक भागवत आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात वाल्मीक कराड यांची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर 36 एकर जमीन असल्याचं एक ट्विट केलं होतं. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधव यांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्याच क्षेत्रफळ साधारण 36 एकर इतकं आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे. दोन वर्षात कालावधीत या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती