spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

वाल्मिक कराड हा नरभक्षक आहे, ही माणुसकीची लढाई – जितेंद्र फडणवीस

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. हा हत्या प्रकरण विधानपरिषदेत खूप गाजला. आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेद करण्यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात वाल्मिकी कराडला अटक करण्याची आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले लोक दिसत आहेत. या मोर्च्यात विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत.

कोण कोण सामील
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, प्रकाश सोळंके, मनोज जरांगे, ज्योती मेटे, जितेंद्र आव्हाड आदी नेते सहभागी झाले आहेत. या मूक मोर्चात सर्वच पक्षाचे लोक आले आहेत. महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुण मोठ्या संख्येने या मोर्च्यात हजर झाले आहेत.

काय आहे मागणी
प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे आहेत. प्रत्येकाच्या हातात फलक आहे. संतोष देशमुखला न्याय द्या, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना अटक करा, असं या फलकवर लिहिलेलं होतं. तसेच वाल्मिकी कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी हे मोर्चेकरी करत आहेत.

ही माणुसकीची लढाई
प्रत्येक नेता आक्रमकपाणे आपले मुद्दे मांडत आहेत. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे, वाल्मिकी कराड यांना अटक करा. याच मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड देखील सामील झाले आहेत. यावेळी ते बोलले, वाल्मिक कराड हा नरभक्षक आहे. तो महाराष्ट्रातील रमन राघव आहे. या नराधमाला ठेचलं पाहिजे. माझा आंदोलकांना पाठिंबा आहे. कारण ही माणुसकीची लढाई आहे. ही कोण्या पक्षाची लढाई नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss