देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीवेळी मी पुन्हा येईन असा नारा दिला. त्यानंतर या त्यांच्या नाऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. आत पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा होतेय. काल भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा हा जुना व्हीडिओ शेअर करण्यात आला. त्यानंतर पुढच्या तासाभरात तो डिलीट करण्यात आला. त्यावर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. हे ट्विट सहज केलं नसल्याचं विजय वडेट्टीवार म्हणालेत.
आज माध्यमांशी बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले आहेत की, यापूर्वीही मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेला निर्णय हा केंद्राला विचारून नव्हता.आरक्षणावरून स्थिती चिघळत असताना केंद्राने त्यात हस्तक्षेप करणे अपेक्षित असताना ते नकार देत आहेत. आज जी परिस्थिती आहे, त्याला जबाबदार राज्य सरकार आहे. आरक्षण देण्याची ऐपत नसल्याने सरकारने राजीनामा द्यावा. राज्याला अधिकार नसताना त्यांनी कुठल्या भरवशावर मराठ्यांना शब्द दिला? जरांगे पाटील यांनी ४० दिवस सरकारवर विश्वास का ठेवला? राज्य सरकार या काळात केंद्राला भेटायला गेले नाही. साप गेल्यावर आता लाठी मारून काय उपयोग? पुन्हा येणारं अस ट्विट असेल आणि ते डिलिट केले तर मी पुन्हा येऊ शकतं नाही, हे माहिती असल्याने केले असावे. एक बाशिंग बाधून तर दोन तयार आहे. सत्ता येणार नसल्याने हे नवरदेव का होऊन बसतं आहे. आताच सरकार केवळ अध्यक्षांच्या भरवशावर आहे. २०२४ मध्ये माविआ सत्तेत येईल त्याला कोणी रोखू शकणार नाही. तसेच ट्विट वरून काही तरी शिजत आहे. हे सहज केलेले ट्विट आहे, अस मला वाटत नाही असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
तर पुढे अजित पवार यांच्यावर बोलत असताना वडेट्टीवार म्हणाले आहेत की, प्रस्तावित मराठा समाज लढत आहे, ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे. आरक्षण वेगळा भाग. पण शिक्षणाचे नुकसान करू नये, आयुष्य उध्वस्त करू नये, ही विनंती. महाराष्ट्रात एकच पक्ष सत्तेत आणि विरोधात देखील आहे. दिवा जब बुझता है तो झगझगाता है. तशी यांची स्थिती आहे. निसर्गासाठी वाघ ही जगले पाहिजे. दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो? हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्ट ३० तारखेला आपला निर्णय देईलच.
हे ही वाचा :
संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…
‘रंग माझा वेगळा’ फेम दीपा पोहोचली अनघा अतुलच्या हॉटेलमध्ये