Thursday, April 18, 2024

Latest Posts

विनायक राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली जोरदार टीका, RSSची स्क्रिप्ट वाचतात

आज एकीकडे नवीन संसद भवनाचे उदघाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंन्द्त मोदी यांच्या हस्ते पार पडले आणि आणि त्यासोबत दिल्लीतील महाराष्ट्र भवन मध्ये वीर सावरकर जयंती ही साजरी करण्यात आल्या पण या दोन्ही कार्यक्रमांना विरोधकांची उपस्थिती ही कमी होती.

आज एकीकडे नवीन संसद भवनाचे उदघाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंन्द्त मोदी यांच्या हस्ते पार पडले आणि आणि त्यासोबत दिल्लीतील महाराष्ट्र भवन मध्ये वीर सावरकर जयंती ही साजरी करण्यात आल्या पण या दोन्ही कार्यक्रमांना विरोधकांची उपस्थिती ही कमी होती. तर दुसरीकडे या सर्व कार्यक्रमांवरून ठाकरे गटाची नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे हा मोदी फक्त झाला आहे अशी बोचरी टीका केली आहे.

तसेच यावेळी बोलत असताना विनायक राऊत यांनी चांगलाच हल्लबोल हा केला आहे. शिंदे गट मोदीभक्त झाला आहे. टीका करण्याखेरीज त्यांच्याकडे काहीही काम नाही. एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्क्रिप्ट वाचतात. एकनाथ शिंदे यांना कावीळ झाली आहे म्हणून त्यांना सगळं पिवळं दिसतंय, असा घणाघात विनायक राऊत यांनी केलाय. तसेच टी पुढे म्हणाले, हिंदी गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाची कावीळ झाली आहे, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय याची पोटदुखी भाजपला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे विनायक राऊत यांनी नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, नवीन संसद भवनाची जी इमारत आहे ती भव्य दिव्य आहे विक्रमी काळामध्ये पूर्ण झाली आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतूक आहे. पण राष्ट्रपती-उपराष्ट्रपती यांच्या हस्ते जर उद्घाटन झालं असतं तर तुमचं काय गेलं असतं? ही लोकशाहीची अवहेलना आहे, असं म्हणत राऊत यांनी नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनावर प्रतिक्रिया दिली आहे.सेंगोलला संसदेचा अर्थ लावणं, लोकशाहीत बिघाड होऊ नये. याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत. पण मग त्याचं पावित्र राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, असंही राऊतांनी म्हटलं आहे. भाजपने सावरकरांचा जयघोष करण्याचा ठेका घेतलेला नाहीये. बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांची शिवसेना असेल. यांनी सावरकरांच्या बाबत कायमच हिरीरीने आपली भूमिका मांडली आहे, असं विनायक राऊत म्हणालेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटावं आणि वीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करून घ्यावा, असं आव्हानच विनायक राऊत यांनी शिंदेंना दिलं आहे.

हे ही वाचा:

New Parliament Building Inauguration, PM मोदींनी केले नवीन संसद भवनाचे उद्घाटन, जाणून घ्या सविस्तर माहिती

दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन, तर सामनातून मोदी सरकारवर घणाघाती टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss