राज्यात विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला आहे. महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजप संघटना यांच्या समन्वयासाठी २७ नोव्हेंबरला पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आता ही जबाबदारी दिल्याने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहे.
विनोद तावडे यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशभरातील भाजप संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका होत होत्या. आता भाजप मंडल अध्यक्षांची निवडणूक 15 डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे.
विनोद तावडेंना अमित शाह यांनी भेटीसाठी बोलवलं होतं. आणि त्यांच्यात भेट झाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रात मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, याचा अमित शाह यांनी अंदाज घेतला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी चर्चा झाल्याची भारतीय जनता पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सर्वांच्याच मनात असणाऱ्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळताना दिसतंय. कारण महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय. मुख्यमंत्रिपदाबाबत मोदी आणि शाह जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल, असं एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मौन बाळगून असलेल्या एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत अनेक अनुत्तरीत प्रश्नांना पूर्णविराम दिलाय.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule