पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर हे आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. एवढंच नाही तर विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात येत आहे. अशातच या सर्व आरोपांवर जयकुमार गोरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जयकुमार गोरे म्हणाले की,” २०१७ साली एक गुन्हा दाखल झाला होता. २०१७ साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यांनतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती. त्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर दोन दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावर ट्रायल होऊन २०१९ साली त्याचा निकाल लागला. त्याच निकालाची प्रत माझ्यासोबत आहे. त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं. जप्त केलेला मुद्देमाल, मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याचवेळी दिला होता. आपली कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा पुनरुच्चार जयकुमार गोरे यांनी केला. माझी बदनामी करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार आहे,” असं जयकुमार गोरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “या देशात लोकशाही आहे, आपल्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाला आता सहा वर्ष झाली आहेत. आज सहा वर्षांनंतर हा विषय पुन्हा समोर आला. आपण कुठल्या वेळी कोणता विषय समोर आणावा, याबद्दल राजकीय नेत्यांनी मर्यादा ठेवली पाहिजे, असं मला वाटतं. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाने ज्या वडिलांनी कष्ट करून मोठं केलं, इथपर्यंत पोहोचवलं त्यांच्या मृत्यूनंतर मला त्यांचं अस्थिविसर्जन सुद्धा करू दिल नाही. एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करू नये,” असे जयकुमार गोरे म्हणाले.
हे ही वाचा:
वाल्मिक कराडच्या विरोधात सर्वात मोठा पुरावा; खंडणी कनेक्शन सिद्ध करणारा व्हिडीओ पोलिसांना सापडला
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश