विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीची सरकार विजयी ठरली आहे. सत्तास्थापनेसाठी महायुतीची चर्चा सुरु आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे यांनी घेतली. दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती, त्यानिमित्त वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार एकत्र आले होते. त्यावेळी, वळसे पाटील यांनी सध्याच्या निवडणूक निकालावर शरद पवार यांच्याशी थोडक्यात चर्चा केली.
पवारांनी सांगितलं की यंदाची निवडणूक वेगळी होती. असं वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. वळसे पाटील यांनी कबूल केलं की त्यांना ट्रम्पेट चिन्हाचा लाभ झाला आणि त्याने आम्ही विजयी झालो. पण इतर बघत तास परिणाम झाला का ते मला माहिती नाही, असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं आहे. तसेच पवार – पवार एकत्र येणयाबाबतही सूचक वक्तव्य केलं आहे.
पवार पवार एकत्र येतील का?
पवार-पवार एकत्र येण्याबाबत विचारले असता, वळसे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, याबाबत अजून वेळ आहे, कारण आधी मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाची घोषणा होईल, नंतरच इतर पक्षांची स्थिती स्पष्ट होईल. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याच्या प्रश्नाबाबत मला माहिती नाही, कोण कुणाच्या संपर्कात आहेत, कोण नाही याची मला माहिती नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. तर, मुख्यमंत्री पदाबाबत आमच्या पक्षाचे आणि इतर पक्षाचे नेते निर्णय घेतील.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”