spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

भाजप आमदार Suresh Dhas यांचा इशारा; गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ४ जानेवारीला परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आला.

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी ४ जानेवारीला परभणीमध्ये मोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धती आहे? छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येप्रमाणेच ही हत्या झाली आहे. त्या लेकराने काय बिघडवले होते? आकाचे आका करलो, जल्दी तयारी, हम निकले है जेलवारी, असा जोरदार हल्लाबोल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तर अजित दादा क्या हुआ तेरा वादा, काय को इसको अंदर लिया? असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाच्या सभेतून सुरेश धस बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोक्का लागला म्हणजे ४-५ वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले, त्यावर आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला केला. बीडवाल्याबद्दल काय काय सांगावे? आका, आकाचे आका… माझ्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. जर आकाच्या आकाने काही केले तर तोही गेलाच समजा. ज्या पद्धतीने यांनी संतोषला मारले ती कोणती पद्धत आहे? आकाच्या आकांनाही जर ते व्हिडीओ दाखवले असतील तर बघा तुमची पण वेळ येणार आहे.

बीडमध्ये मराठा समाजालाच नव्हे तर इतर जातीच्या लोकांना पण काय वागणूक मिळत आहे, ते पहिले गेले पाहिजे, असे सांगत आमदार सुरेश धस म्हणाले, मी अजितदादाला म्हणालो, “आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले. देवेंद्र फडणवीस यांची काही अडचण असेल तर बीडमधून तुम्ही पण प्रकाश सोळंके किंवा राजेश विटकरला मंत्रिपद द्या.”

हे ही वाचा:

Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…

Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss