spot_img
Saturday, March 22, 2025

Latest Posts

WCD Maharashtra Recruitment: मंत्री आदिती तटकरेंची मोठी घोषणा, महिला-बालविकास’मध्ये पदभरती

या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महिला व बाल विकास विभागात मोठी भरती करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने जुन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हा आहे. यासंदर्भात धोरण तयार करणे, कार्यक्रम/ योजना तयार करणे, विकास योजनांची अंमलबजावणी करणे तसेच महिला व बाल विकास कार्यात काम करणाऱ्या सरकारी आणि समाजसेवी संस्थांमध्ये समन्वय साधणे ही या विभागाची मुख्य कामे आहेत. या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. महिला व बाल विकास विभागात मोठी भरती करण्यात येणार आहे. राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत (mahila bal vikas vibhag bharti 2025 maharashtra) एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३ हजार २४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८ हजार ८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी दिली.

मुख्य सेविका पदासाठीही १४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी उचित खबरदारी घेण्याचे निर्देश तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विविध रिक्त पदांवर भरती करण्यासाठी तटकरे यांनी मंत्रालयातील दालनात बैठक घेतली. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा (Women and child development maharashtra bharti 2025) योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांसाठीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशा सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र हे देशातील लोकसंख्यबाबत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून यामध्ये ११.२ कोटी नागरीक वास्तव्य करीत आहेत. महिलांची संख्या साधारण ५.४१ कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ४८% आहे. बालकांची (0-६ वर्षे वयोगट) संख्या साधारण १.३३ कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १२% आहे. 0-६ वर्षे वयोगट लिंगदर ८९४ आहे. त्यामुळे या विभागात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिलांनी या संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर संपर्क करा.

Latest Posts

Don't Miss