मराठा आरक्षणासाठी उपोषण आंदोलनावर असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चर्चा केली. यावेळी उद्धव यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा व्यक्त करताना आम्ही तुमच्यासोबत आहोत, प्रकृतीची काळजी घ्या, अशी विनंती केली आहे .
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण आणि आमदार अपात्रतेच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. तुम्ही तुमच्या तब्येतेची काळजी घ्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत असे उद्धव यांनी म्हटले. मराठा आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणासंदर्भात भूमिका मांडावी. त्यासोबतच गरज पडल्यास आधीमंत्र्यांनी आणि नंतर महाराष्ट्रातील खासदारांनी राजीनामे द्यावे असे आवाहन सुद्धा मी पत्रकार परिषदेतून केला असल्याचं जरांगे पाटील यांना माहिती देताना उद्धव ठाकरेंनी यांनी सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी उपसमितीची जी बैठक घेतली आहे. त्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय तर दुसरे उपमुख्यमंत्री भाजपच्या प्रचारात व्यस्त होते.राज्य जळत असताना उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात होते. विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लावता येत असतील तर लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबाबत काय म्हटले?
केंद्राची कॅबिनेट बैठक होईल तेव्हा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांनी मराठा आरक्षण विषय कॅबिनेटमध्ये गेले आहेत.
मराठा आरक्षणासाठी उपसमितीची जी बैठक घेतली आहे. त्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित होते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय तर दुसरे उपमुख्यमंत्री भाजपच्या प्रचारात व्यस्त होते.राज्य जळत असताना उपमुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात होते. विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लावता येत असतील तर लावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा, नाना पटोले
World Cup 2023, भारताच्या विजयाने सेमीफाइनलचा मार्ग झाला मोकळा
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.