Friday, March 29, 2024

Latest Posts

आम्हाला महाविकास आघाडी आणि वज्रमुठ टिकवायची आहे – जयंत पाटील

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने मविआतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील आरोपानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याने मविआतून बाहेर पडण्याचा इशारा ठाकरे गटाला दिला आहे. अशातच सध्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत ‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.’ असा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आम्हाला महाविकास आघाडीची वज्रमुठ टिकवायची आहे. तर ते पत्रकार आहेत, संपादक आहेत. संजय राऊत यांनी वेगवेगळ्या बाजू समजून घेऊन ही वक्तव्य केली असतील असं जयंत पाटील म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर शरद पवार, छगन भुजबळ तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी देखील टीका केली आहे तर जयंत पाटील यांनी आधीच आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील बोलताना म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडी आणि वज्रमुठ टिकवायची आहे. त्यामुळे मी या प्रकरणावर किंवा संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना उचित ठरणार नाही असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. याधीही संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी संजय राऊत यांना आमच्या पक्षात चोमडेगिरी करू नका, तुमच्या पक्षात लक्ष द्या असं म्हंटलं होतं. तर अजित पवारांनी राऊत यांनी राष्ट्रवादीची वकिली करू नये त्यांनी त्यांच्या पक्षावर बोलावं असं म्हंटलं तर छगन भुजबळ यांनी आज लिहलेल्या अग्रलेखावर बोलताना म्हंटलं की, संजय राऊत यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा प्रश्नही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये नेमके काय होणार याबाबत सांबारं निर्माण झाला आहे.

हे ही वाचा : 

Majhi Tujhi Reshimgath मधील परीची आता हिंदी मालिकेत एन्ट्री 

‘Sanskritik Kaladarpan’ पुरस्कार सोहळा संपन्न, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘सर्वश्रेष्ठ कलागौरव पुरस्कार’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss