बारामती (Baramati) येथे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दिल्ली (Delhi) येथे शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, याआधी कुंभमेळ्यात देखील अतिशय दुर्दैवी घटना झाली होती. आता पुन्हा अशी घटना झाली. कुठेतरी मिस मॅनेजमेंटमुळे अशा घटना घडत असून सरकारने यावर माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
केजरीवाल काँग्रेस (Congress) टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि केजरीवाल यांची भेट झाली याबाबत त्यांची चर्चा झाली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुरस्कार दिला, त्याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले होते. त्या मुद्दयावर बोलताना खासदार सुळे यांनी सांगितले की, राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लावून सुसंस्कृतपणा येत नाही त्यासाठी सुसंस्कृतपणा दाखवावा देखील लागतो. शिवसेनेचे काही नेत्यांबरोबर दिल्लीत चर्चा केली आहे. भविष्यात कोणीही दुखावलं जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकार अडीच लाखांच्यावर उत्पन्न असलेल्या महिलांना वगळणार असल्याबाबत प्रश्न उपस्थतीत केला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मला यात काही आश्चर्य वाटत नाही. लाडकी बहीण योजना निश्चित चांगली असून आम्ही सरकार आल्यानंतर तीन हजार देणार होतो. आम्ही लाडकी बहीण योजनेत कोणालाही वगळले नसते कारण आम्ही आर्थिक नियोजन करून तीन हजार देणार होतो, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. आता राज्याच्या अर्थसंकल्पात काय होतंय त्याची वाट पाहू असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी कर्जमाफीच्या मुद्दयावर विचारलेल्या प्रश्नावर केले.