शरद पवार गटातील खासदारांना सुनील तटकरे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी तटकरे यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.
संजय राऊत म्हणाले की, ” अजित पवारांपासून ते तटकरे यांच्यापर्यंत आणि प्रफुल्ल पटेल यांना आज सर्वांना जे काही मिळाले आहे ते शरद पवार यांच्यामुळे मिळाले आहे. आज जी काही किंमत बाजारात आहे ते शरद पवार यांच्यामुळे आहे. एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जे ४० चोर गेलेत त्यांची किंमत जी आहे ती शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. तटकरे यांची ही भाषा अमानुष आणि क्रूर आहे. तुम्ही बाप आणि लेकीला सोडा या भाषेपर्यंत येता या का? कारण तुम्हाला केंद्रात मंत्री पद हवं आहे आणि अमित शहा यांना खुश करायचे आहे. कठीण परिस्थितीत शरद पवारांनी आठ खासदारांना निवडून आणले, जर ते सोडून जात असतील तर ते रावणांचे वंशज आहेत.”
तर बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकरणी बोलताना म्हणाले की, “या महाराष्ट्रात सर्व माफियांना अभय आहे. सरकारमधील अनेक मंत्री थेट माफियांशी संबंधित आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून दबाव आहे. अजित पवार आणि फडणवीस यांची हिंमत नाही. आपले जातीय मतं बँक सांभाळण्यासाठी खऱ्या खुन्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे ९०% खून हे बीड मधील हे त्यांच्या समाजातले आहेत.”
संतोष देशमुख यांचा खून जेवढा निर्घृण आहे, तेवढीच ही भाषा क्रूर आणि निर्घृण आहे. ज्या पितृतुल्य नेत्याने तुम्हाला या स्तरावर नेले, पण तुम्ही बाप लेकीला सोडा, ही भाषा वापरण्यापर्यंत या स्तरापर्यंत येता ही गंभीर आहे. केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी तुम्ही ही पातळी गाठता, ते क्रूर आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले.
हे ही वाचा:
वाल्मिक कराड पडला CID कोठडीत आजारी, उपचार सुरु
Bigg Boss 18 : धनश्रीसोबत घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, युझवेंद्र चहल बिग बॉसमध्ये प्रवेश करणार!