Saturday, April 20, 2024

Latest Posts

पुणे लोकभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी कोणता निर्णय घेणार ?

पुणे लोकसभेची जागा ही भाजपचे नेते तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. यामुळे या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

पुणे लोकसभेची जागा ही भाजपचे नेते तसेच पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. यामुळे या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. परंतु पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या या जागेवरून महाविकास आघाडीत वाद सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर दावा करण्यात आला असून, काँग्रेस ने निवडणूक लढण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. काँग्रेसच्या या आक्रमक निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ने दोन पावले मागे घेतली आहेत.

काँग्रेसच्या या आक्रमक निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक रद्द केली. या कारणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन पावल मागे घेताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस ने पुणे लोकसभा मतदार संघात तयारीला सुरवात केल्याचे चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसह हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर दिली आहे. आठही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कमिट्यांचा आढावा घेऊन त्याची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आले आहे. या बूथनिहाय कमिट्याची जबाबदारी तुपे यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला होता. माध्यमांशी बोलताना काहीच दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले होते की, पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पुण्याची सध्याची परिस्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, त्यानुसार या जागेचा निर्णय होईल. परंतु या अजित दादांच्या या वक्तव्यानंतर शनिवारी मात्र काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला.

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. मुंबईत शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सर्व काँग्रेस नेत्यांचे पुणे पोटनिवडणुकीसंदर्भात एकमत झाले. नंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.तसेच शहराध्यक्षांना पक्ष संघटनात्मक तयारी करण्याच्या देखील सूचना दिल्या. पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचं लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठीही तयारी करण्याचे आदेशही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

हे ही वाचा:

लाखो शिवभक्त Shivrajyabhishek दिनानिमित्त रायगडावर

शाळासुरु होण्याआधी या वस्तूंची खरेदी न विसरता करा

Monsoon पूर्वी चक्रीवादळ होणार दाखल? ‘Biparjoy’ चक्रीवादळाचा धोका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss