Friday, March 29, 2024

Latest Posts

काय म्हणाले सत्तासंघर्षाच्या निकालावर संजय राऊत

आज महाराष्ट्राच्या महासत्ता संघर्षाचा निकाल काही मिनिटात लागणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे.

आज महाराष्ट्राच्या महासत्ता संघर्षाचा निकाल काही मिनिटात लागणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे. यावर अनेक नेते त्यांची मते ते देत आहेत यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, मला काहीही अपेक्षा नाही मला फक्त न्यायाची अपेक्षा आहे. मलाच नाही सर्वानाच न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्याय विकत घेणारी माणसं नाही आहोत. जे न्याय विकत घेऊ शकतात ते सत्तेवर आहेत. त्यांना जी खात्री वाटत आहे निर्णय आमच्या बाजूने लागेल की आम्ही न्याय विकत घेऊ शकतो आम्ही तसे म्हणणार नाही आमचा न्यायावर विश्वास आहे. घटना पीठ जे आहे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी प्रदीर्घ काळ ही सुनावली केली आणि दोन्ही भूमिका ऐकल्या. आज ते निर्णय देतील आणि आम्ही सर्व निर्णयाच्या प्रतीक्षेत आहोत असे संजय राऊत म्हणाले.

जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे ज्या देशाला संविधान आणि घटना दिली त्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा हा महाराष्ट्र आहे. आम्हाला खात्री आहे सर्वाच्च न्यायालय संविधानाची लोकशाहीची हत्या करणार नाही, आजचा फैसला सिद्ध करेल की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही, या देशांमध्ये स्वतंत्र टिकले की नाही, या देशामध्ये संसद विधानसभेचे महत्व आहे की नाही आणि या देशामध्ये न्यायालय स्वतंत्र आहेत की नाही आज त्याचा फैसला होणार आहे. आजच्या निकालावर फैसला होईल की लोकशाही आहे, स्वतंत्र आहे, न्यायव्यवस्था आहे असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हेच निकालाच्या आधी बोलत आहेत. आम्हाला चिंता करण्याचे कारण नाही निकाल आमच्या बाजूने लागेल. हा मूर्खपणा कोण करत आहेत आता जर त्यांना बुद्धी सुचली असेल तर त्यांना आता सत्याची जाणीव झाली असेल. किंबहुना ते आणि त्यांनी ज्यांना मांडीवर घेतले आहे ते सर्व मूर्ख आहेत असे संजय राऊत म्हणाले. ते मूर्खच बोलत आहेत की निकाल आमच्या बाजूने लागेल. सर्वाच्च न्यायालयाचा अपमान आहे असे बोलणारे की निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. निकाल लागल्याच्या नंतर कोण कुठे जाणार की यांनाच पाताळात गाडलं जात हे तेव्हाच पाहू असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss