Monday, June 5, 2023

Latest Posts

सत्तासंघर्षाच्या निकालानंतर काय म्हणाले संजय राऊत

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे आणि शिंदे सरकार ला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकार ला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे आणि शिंदे सरकार ला मोठा दिलासा मिळाला आहे. शिंदे सरकार ला मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाचा कोर्टामध्ये पराभव झाला आहे. ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कोर्टाने निर्णय दिला आहे. १६ अपात्र आमदारांचा निकाल आम्ही देणार नाही असे कोर्टाने सांगितले आहे. १६ अपात्र आमदारांचे हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार आहे.अपात्रतेचा निर्णय अध्यक्षच घेणार असे कोर्टाने सांगितले आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, सर्वाच्च न्यायालयाचे आम्ही आभारी आहोत काही गोष्टी इकडे तिकडे आहेत त्यावर आम्ही चर्चा करू.

पुढे संजय राऊत म्हणाले की, पहिली तीन निरीक्षणे अत्यंत महत्वाची आहेत. पहिले म्हणजेच शिंदे गटाने नेमलेल्या व्हीप हे बेकायदेशीर ठरले आहे. सुनील प्रभू हेच अधिकृत व्हीप आहेत आणि योग्य व्हीप असल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्या व्हीप नुसार हे आमदार बेकायदेशीर ठरलेले आहेत. फक्त तो निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घायचा आहे. विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर पालन करू शकत नाहीत. न्यायालयने सांगितलेले आहे व्हिपची खातरजमा करून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घायला पाहिजे होता. हे जस्टीस चंद्रचूड यांनी सांगितल्यावर तुम्ही दिलासा मिळाला असे कसे बोलू शकता. हे सरकार बेकायदेशीर आहे असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss