Thursday, April 25, 2024

Latest Posts

सुषमा अंधारेंच्या सभेवरून नेमकं घडला काय प्रकार ?

सुषमा अंधारे च्या सभेने ही सांगता सभा होणार असल्याने जवळपास महाराष्ट्रभराचे लक्ष लागलं होतं. चंद्रकांत खैरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या सभेला हजर राहणार यामुळे नेमकं मातब्बर नेते मंडळी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेची सांगता झाली,

सुषमा अंधारे च्या सभेने ही सांगता सभा होणार असल्याने जवळपास महाराष्ट्रभराचे लक्ष लागलं होतं. चंद्रकांत खैरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे या सभेला हजर राहणार यामुळे नेमकं मातब्बर नेते मंडळी काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेची सांगता झाली, या यात्रेदरम्यान सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, सुषमा अंधारे यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी बीडच्या या सभेला हजेरी लावून होते. राज्यातील राजकीय महानाट्य नंतर सुषमा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. यात राज्यभरात ही यात्रा पोहोचली यातून सूषमा अंधारे यांनी अनेक राजकीय गोष्टी उलघडल्या यात अनेक बड्या नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडले.

बीडमध्ये काल सभा पार पडली. मात्र सभेआधीच सोशल मीडियावर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या मंत्री आमदारांनी रिकाम्या खुर्च्यांचे सभेतील फोटो व्हायरल केले. त्यामुळे फेल महाप्रबोधन यात्रा असेही वक्तव्य करण्यात आले. नितेश राणेंनी देखील या फोटोला ट्विट करत शकुनी मामांचा बीडमध्ये फ्लॉप शो असं ट्विट करत कुठेतरी ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील ट्विट करत ते फोटो पोस्ट केले. ठाकरे गटातील कार्यकर्तेही सोशल मीडियावर कमी पडले नाहीत. सभा सुरू झाल्यानंतर सभेथळी काय परिस्थिती आहे याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. खचाखच भरलेलं सभास्थळ त्यात दिसत असून यात एकही खुर्ची रिकामी नसल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. हाती आलेल्या माहितीनुसार सभास्थळी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती आणि पूर्ण सभा संपेपर्यंत मैदानावरील गर्दी कमी झालेली नव्हती. सुषमा अंधारे यांनी होम पिचवर देखील भाजपचा सडकून समाचार घेतला. यात लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदी सरकार आणि मोदींनी निवडून येताना जनतेला काय काय आश्वासन दिली होती याचे व्हिडिओ जनतेला दाखवून दिलं. देवेंद्र फडणवीस देखील कारस्थानी असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं.

तसेच संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर चांगलेच भडकलेले दिसले. आता जनतेसमोर जाताना तुम्ही मोदींचा फोटोवर निवडून या, मग तुम्हाला मानू असं ते म्हणाले.बीडच्या जिल्हाप्रमुखांनी बोलताना आमचा अंदाज दहा हजारांच्या जवळपास शिवसैनिक येतील असा होता मात्र त्यापेक्षा जास्त शिवसैनिक आणि जनता सभेला जमल्याचं सांगितलं. दोन दिवसापूर्वी या सभेला गाला बोट लागल्याचा प्रकार घडला होता. मात्र, ही सभा उधळून लावण्याचा देखील अनेकांचा प्रयत्न करण्यात आला होता हा डाव आम्ही फेल केल्याचं शिवसैनिकांनी सांगितलं.

हे ही वाचा:

नरहरी झिरवळांचा एक वेगळाच अंदाज

अजित पवारांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर खोचक टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss