राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असले तरीही मुख्यमंत्री कोण होणार याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा लवकरच होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. अश्यातच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय की यांना प्रदीर्घकाळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे. आता संविधान घटना वगैर नाहीये, आम्ही असतो तर इतक्यात त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. महाराष्ट्राचे निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. निकालावर लोक खुश नाहीत. स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री अमावस्येच्या निमित्ताने गावाला गेले आहेत. त्या अमावस्येचा काय महत्व आहे काय माहिती. महाराष्ट्र वाट पाहत आहे कोण मुख्यमंत्री होणार. या राज्यांच्या निकाला संदर्भात देशभरात नाही तर जगभरात संशय व्यक्त करण्यात आला. ७६ लाख मतांचं नेमकं काय झालं ही मते कुठून आली? त्याचप्रमाणे हरियाणामध्ये १४ लाख मते वाढली. या ७६ लाख मतांचा हिशोब लागत नाही. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान सुरू होतं, रांगा लावून कुठे नेमकं मतदान सुरू होतं निवडणूक आयोगाने हे दाखवावं, असे संजय राऊत म्हणाले.
महायुती (Mahayuti) चा हा विजय खरा नाही. बाबा आढाव आणि त्यांच्यासोबत असंख्य या आंदोलनात उतरले आहेत या राज्याची लोकशाही धोक्यात आहे समाज व्यवस्था धोक्यात आहे. निवडणूक आयोग भ्रष्ट झाला आहे आता ते महाराष्ट्राला कलंक लावणार आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”