spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मागच्या वर्षीच्या करारांचं पुढे काय झालं ? Jayant Patil यांनी सरकारला डिवचले

राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे.

दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुतंवणूक असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झालं ! असे त्यांनी म्हटले आहे. याबाबतीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर आपलाही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक, दुसऱ्या दिवसापर्यंत १५.७० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी एकूण ५४ सामंजस्य करार झाले. दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून अशा बातम्या रोज येत आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले! कारण मागील वर्षीही अशाच प्रकारच्या बातम्या येत होत्या. उदा. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसमवेत २५ हजार कोटींचा करार झाला. जिंदाल यांच्यासमवेत ४१ हजार कोटींचा करार तर हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचा करार झाला. या करारांचं पुढे काय झाले, प्रत्यक्षात किती गुंतवणूक आली हे राज्यकर्त्यांनांच ठाऊक. यंदाही गुंतवणुकीची मोठी यादी सरकारने मांडली आहे. मोठ्या मोठ्या वल्गना केल्याचे दिसून येत आहे. या गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा व महाराष्ट्राची भरभराट व्हावी असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांनी सरकारला डिवचल्याचं दिसलं. मागील वर्षीच्या दावोसमधील करारांचे उदाहरणं देत त्या करारांचे काय झालं असा सवालही त्यांनी केलाय. सरकारने केलेल्या या गुंतवणुकी फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

 ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss