spot_img
spot_img

Latest Posts

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ?

इंडिया या विरोधकांच्या पक्षांची बैठक आज आणि उद्या पार पडणार आहे. या बैठकीसाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत. राहुल गांधी हे काही वेळातच पत्रकारांशी संवादही साधणार आहेत. तर मागच्या काही दिवसांपासून इंडियाच्या बैठकीची चर्चा आहे

इंडिया या विरोधकांच्या पक्षांची बैठक आज आणि उद्या पार पडणार आहे. या बैठकीसाठी २८ पक्ष एकत्र आले आहेत. राहुल गांधी हे काही वेळातच पत्रकारांशी संवादही साधणार आहेत. तर मागच्या काही दिवसांपासून इंडियाच्या बैठकीची चर्चा आहे. आज सकाळी तर संजय राऊत यांनी इंडिया को हराना मुश्किल ही नहीं नामुमकीन है असंही म्हटलं आहे. अशात या बैठकीवर आणि जमलेल्या सगळ्या पक्षांवर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मोदींजीना हटवायचं एवढा एकच अजेंडा या पक्षांपुढे आहे. पण ते शक्य होणार नाही कारण लोकांच्या मनात मोदी आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केवळ मोदीजी हटाव एवढा एकमेव अजेंडा घेऊन ते पक्ष एकत्र आले आहेत. मात्र अशा प्रकारचा अजेंडा कुणी कितीही आणला तरीही लोकांच्या मनात जोपर्यंत मोदीजी आहेत तोपर्यंत ३६ काय १०० पक्ष एकत्र आले तरीही लोकांच्या मनातून ते मोदींना काढू शकत नाहीत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. शेवटी मोदीजी लोकांच्या मनात, त्यांच्या कार्यामुळे,नेतृत्वामुळे आणि देशाला प्रगतीपथावर नेल्यामुळे आहेत. गरीब कल्याणाचा अजेंडा त्यांनी राबवला त्यामुळेच मोदीजी सामान्यांच्या मनात आहेत. आपला विचार न करता सर्वस्व देशाला देण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्यामुळे मोदीजी लोकांच्या मनात आहेत. या ठिकाणी जे पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत ते काही देशाचा विचार करुन नाही तर आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहेत ही दुकानं कशी वाचवायची यासाठी हे सगळे एकत्र आले आहेत.

आजच पाच पार्ट्यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकला आहे. इंडियाचे पक्ष पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत. यांनी ठरवला तरीही तो जनतेला पटला पाहिजे. यांचा कुठलाही उमेदवार जनतेलाही पटत नाही. बॅनरबाजी करुन, एकत्र येऊन आणि घोषणाबाजी करुन आपला टाइमपास ते करत आहेत. मात्र त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव… नेमके काय घडले …

ITMS प्रणालीच्या कामासाठी उद्या दोन तासांचा ब्लॉक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss