गुन्हेगारांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो. पोलिसांच्या थर्ड डिग्रीसमोर चांगले चांगले गुन्हेगार आपले गुन्हे कबुल करतात, असं म्हंटल जातं. हे काही प्रमाणात खरं असलं तरी सगळ्याच केसेसमध्ये हा फॉर्मुला लागू होत नाही. काही असे गुन्हेगार असतात, जे काहीही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात. त्यावेळी गुन्हेगाराला खरं बोलायला भाग पाडणारं अस्त्र यावेळी उपयोगात येत, ते म्हणजे नार्को टेस्ट. एखादा आरोपी तपासात सहकार्य करत नसेल तर पोलिसांकडून न्यायालयाकडे नार्को टेस्ट करण्याची परवानगी मागितली जाते आणि नार्को टेस्ट केली जाते. आता नार्को टेस्ट म्हणजे काय, ही टेस्ट कशी केली जाते? यावेळी खबरदारी काय घ्यावी लागते? या टेस्टमुळे जीवाला धोका असतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून.
गुन्हेगारांकडून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांना विविध डावपेचांचा अवलंब करावा लागतो. गुन्हेगारांना सत्य बोलण्यास भाग पाडण्यासाठी कधी- कधी पोलीस थर्ड डिग्रीचाही वापर करतात. पण काही असे गुन्हेगार असतात, जे काहीही झाले तरी सत्य सांगण्यास नकार देतात. त्यावेळी पोलीस गुन्हेगारांची नार्को टेस्ट करू शकतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा पोलीस न्यायालयाची परवानगी घेऊन गुन्हेगाराची नार्को टेस्ट घेतात, जेणेकरून खटला निकाली काढता येईल.
नार्को टेस्ट किंवा नार्को विश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काही औषधे दिली जातात. ज्यामुळे ती व्यक्ती अर्धवट बेशुद्ध होते. नार्को टेस्टचा वापर पोलीस चौकशीदरम्यान सहकार्य न करणाऱ्या लोकांकडून लपविलेली माहिती काढण्यासाठी केला जातो. नार्को टेस्ट ही गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यासाठी केला जातो, असा तज्ज्ञांचा दावा आहे. कोणत्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलीग्राफ टेस्ट करणे बंधनकारक आहे. या चाचणीला लाय डिटेक्टर टेस्ट असेही म्हणतात, ज्यामध्ये आरोपी खरे बोलतो की खोटे? हे मशीनच्या मदतीने जाणून घेतले जाते.
नार्को टेस्ट ही डिसेप्शन डिटेक्शन टेस्ट आहे, ज्यामध्ये पॉलीग्राफ आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट देखील येतात. गुन्ह्याशी संबंधित सत्य शोधण्यासाठी नार्को टेस्टची मोठी मदत मिळते. ही चाचणी व्यक्तीला हिप्नोटिज्म अवस्थेत घेऊन जाते. त्यामुळे आरोपी विचार करून उत्तर देण्याच्या स्थितीत नसते. त्यामुळे तो जे काही खरे आहे, तेच सांगतो. नार्को टेस्टआधी व्यक्तीची फिटनेस चाचणी केली जाते. ज्यामध्ये फुफ्फुसाची चाचणी, हृदय चाचणी यांसारख्या प्री-ॲनेस्थेटिक टेस्ट केल्या आहेत. ही टेस्ट करताना भूलतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय कर्मचारी तिथे उपस्थित असतात. नार्को विश्लेषण टेस्ट करत असताना आरोपीच्या शरीरात इंजेक्शनद्वारे ‘सोडियम पेंटोथल’ हे औषध सोडले जाते. हे औषध शरीरात जाताच आरोपी संमोहित अवस्थेत जातो, त्याचे आत्मभान आणि कल्पना करण्याची क्षमता खुंटते. त्यामुळे या अवस्थेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आरोपीला खोटे बोलणे अवघड होऊन जाते.
नार्को टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा डोस आरोपीच्या वजनावर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीसाठी डोस देण्याचे प्रमाण वेगळे असतात. डॉक्टर परिणामानुसार डोस वाढवू किंवा कमी करू शकतात. औषधे व्यक्तीला हिप्नोटिज्म अवस्थेत ठेवतात, ज्यामुळे तो जाणूनबुजून काहीही बोलू किंवा लपवू शकत नाही. संबंधित व्यक्ती एका वाक्यात उत्तर देतो.
नार्को टेस्ट अवैध?
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सत्य उघड करण्यात नार्को टेस्टने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आरुषी हत्याकांडात ही टेस्ट अपयशी ठरली. कारण नार्को टेस्ट न्यायालयात वैद्य मानली जात नाही. नार्को टेस्टमध्ये मिळालेल्या माहितीमुळे पुरावे गोळा करण्यास मदत झाली आणि ते पुरावे योग्य असल्यास न्यायलय पुढील निर्णय घेते.जरी नार्को-विश्लेषणासारख्या चाचण्यांना कोणतीही कायदेशीर वैधता नसली तरी, अर्ध-जाणीव व्यक्तीचे जबाब किंवा कबुलीजबाब न्यायालयात मान्य नसले तरी तपासादरम्यान पोलिसांकडून या चाचण्या केल्या जातात.
1872 चा भारतीय पुरावा कायदा, जो भारतीय न्यायालयांमध्ये पुराव्याच्या मान्यतेवर नियंत्रण ठेवतो, नार्को विश्लेषण, खोटे शोधक चाचण्या किंवा सत्य सीरम यासारख्या चाचण्यांचे परिणाम स्वीकार्य पुरावे म्हणून ओळखत नाही. तपास यंत्रणा आणि इतरांकडून मिळालेल्या अभिप्रायावरून मूल्यांकन केल्यानुसार यशाचा दर 96-97 टक्के आहे. नार्को विश्लेषणाच्या अधीन असलेल्या एकूण लोकांपैकी सुमारे 25 टक्के लोक “निर्दोष” असल्याचे निष्पन्न झाले. म्हणून, “निर्दोष व्यक्तींचे हक्क” स्थापित आहेत.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.