अजित पवार हे नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहतात ते म्हणजे रोखठोक दादा, अधिकाऱ्यांची परेड घेणारे आणि कामात चोख असणार नेता म्हणून अजित पवारांकडे पाहिल जात, आता पर्यंत काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात अजित पवारानी काम केलं मात्र या विधानसभेला अजित पवारांच्या राजकीय भविष्यावर बरीच टीका झाली, मात्र अजित पवारांनी ४१ आमदार निवडून आणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच अस्तित्व सिद्ध केलं. आज अजित पवार ६ व्यंदा उपमुखमंत्री पदाची शपथ घेतायेत. काल अजित पवारांनी थेट शिंदेवर प्रश्न विचारलं असता शिंदेंची फिरकी घेत शिंदेंच माहिती नाही मात्र आपण तर शपथ घेणार आहे बाबा अस म्हणत पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट स्वभावाचा दाखला दिला. अजित पवारांची राजकीय कारकिर्द पहिली तर त्यांची सुरुवात ही बारामतीच्या लोकसभेत निवडून आल्यावर खासदार म्हणून झाली. अजित पवार दिल्लीला गेले मात्र दिल्लीत फारसे जम बसला नाही कारण शरद पवार दिल्लीत गेल्यानंतर अजित पवार महाराष्ट्रात आले आणि दुसऱ्या प्रयत्नात अजित पवारांना उपमुखमंत्री पदाची संधी मिळाली. ती आजतागायत अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावरच राहिले, त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही आणि राष्ट्रवादी भाजप बरोबर सत्तेत घेवून गेल्यानंतर अजित पवारांनी जाहीर व्यासपीठावरून मला मुख्यमंत्री का केलं नाही माझ्यात क्षमता नव्हती का, हा सवाल थेट शरद पवाराना विचारला होता. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारानी बहिणीच्या विरोधात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नीला सुनेत्रा पवारांना उभं केलं. मात्र सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. विधानसभेला तर सख्ख्या भावाचा मुलगा अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार उभे राहिले. अजित पवार विधानसभेला १ लाखाच्या वर मतांनी निवडून आले आणि बारामतीचा दादा आपणच असल्याचं स्पष्ट केलं.
या विधानसभेला महाराष्ट्रात अजित पवारांना धक्के द्यायला सुरुवात केली होती. अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत होते. अजित पवारांची चारही बाजूंनी शरद पवारांनी कोंडी केली होती. माझा पक्ष उभा केलेला मोडला अस शरद पवार सांगत होते. मात्र दुसरीकडे आजीत पवार मी कामाचा माणूस आहे आणि कामावरच बोलणार अस सांगत प्रचार करत होते. अर्थमंत्री म्हणून मांडलेली अर्थसंकल्पातील लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आणि जवळपास ४१ आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले. महाराष्ट्राचा वादा अजित दादा ही घोषणा आपल्याला विधानसभेत पाहायला मिळाली. मात्र या विधानसभेत अजित पवारांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं होत. शेवटी अजित पवारांनी भाजपच्या मदतीने बाजी पलटवली आणि आमदार निवडून आणले. आज अजित पवार सहाव्यादा शपथ घेतायेत. नवा विक्रम अजित पवार निर्माण करण्यासाठी सज्ज झालेत. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? त्यांनी लढलेली पहिली लोकसभेची निवडणूक ते एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात घेतलेली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपत घेणार. त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास कसा होता बघुयात.
१९८५ ला अजित पवार यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून राजकारणात प्रवेश केला. नंतर 1991 मध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या (PDC) अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. पुढे त्यांनी छत्रपती साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते छत्रपती बाजारचे चेअरमन झाले. विद्या प्रतिष्ठान आणि पुणे जिल्हा विकास प्रतिष्ठानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ते 10 व्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. अवघ्या चार महिन्यात त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. राजीव गांधी यांची हत्या झाली. त्या काळात शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पण त्यावेळी त्यांना केंद्रात बोलावण्यात आलं. तेव्हा शरद पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला. शरद पवार केंद्रात संरक्षणमंत्री झाले अन् अजित पवार बारामतीतून आमदार झाले. 1993 ला झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी शरद पवार राज्यात परतले. ते पुन्हा मुख्यमंत्री झाले अन् त्यांच्या मंत्रिमंडळात मृदसंधारण, ऊर्जा आणि नियोजन खात्याच्या राज्यमंत्रिपदाचा पदभार अजित पवार यांच्याकडे देण्यात आला.
1999 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा अजित पवार पाटबंधारे आणि फलोत्पादन मंत्री झाले.
1995 ला अजित पवार बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1999 ला त्याच मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर पुन्हा निवडून आले. त्यांचा प्रथमच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर 2003 पर्यंत त्यांनी पाटबंधारे मंत्री म्हणून काम पाहिले. पवार यांनी डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2004 या काळात ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम केले.
2004 मध्ये अजित पवार पुन्हा बारामतीतून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. ते जलसंपदा मंत्री झाले. ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते.
2009 मध्ये बारामतीतून आमदार म्हणून त्यांची ही सलग चौथी टर्म होती. पुढे अजित पवार यांच्यासाठी नवी संधी आली ती उपमुख्यमंत्रिपदाची. 2010 ते 2012 या काळात ते उपमुख्यमंत्री राहिले. शिवाय वित्त नियोजन आणि ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं. 2012 ते 2014 या काळात वित्त, नियोजन आणि ऊर्जा या खात्यांसह उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांकडे राहिली. 2019 ला एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येण्याच्या हालचाली सुरू असताना अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले. त्यांनी 23 नोव्हेंबर 2019 ला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोठ्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाला. हे सरकार केवळ 80 तासच टिकलं. त्यांच्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
2019 ते 2022 या काळात अजित पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री राहिले. त्यांनतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाणं पसंत केल. 2 जुलै 2023 ला अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याकडे वित्त आणि नियोजन ही खातीही देण्यात आलं, आणि २०२४च्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आणि पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आले, आणि ५ डेसिमेंबरला ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सलग ८ वेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. आणि सहाव्यांदा ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. तब्बल 32 वर्षांहून अधिककाळ बारामती मतदारसंघात त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलाय. अजित पवारांचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाच्या कारकर्त्यांचे आणि बारामती कारणंच लक्ष लागला आहे.
हे ही वाचा: