spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

भाजपकडून Devendra Fadnavis यांना ग्रीन सिग्नल मिळाल्यास उबाठाची भूमिका काय ?

अद्याप मुख्यमंत्री पदाची कोणतीही घोषणा झालेली नाही. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय असेल? असा परतून संजय राऊत यांना विचारण्यात आला.

महाराष्ट्र विधानसभेत २३० जागा जिंकून महायुती सत्तेत आली. मात्र निकाल लागून ५ दिवस झाले तरी महाराष्ट्राच्या सत्त्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व जनता अशा लावून बसली होती. मात्र काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी शाह यांच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. तर भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल असल्याचं दिसतंय. मात्र अद्याप मुख्यमंत्री पदाची कोणतीही घोषणा झालेली नाही. अशातच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय असेल? असा परतून संजय राऊत यांना विचारण्यात आला.

मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय असेल, यावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री कोण असेल हे अजूनही ठरत नाही. २०० पेक्षा जास्त जागा येऊनही मुख्यमंत्री ठरत नाही. भाजपाला पूर्ण बहुमत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्रीपद का लटकून पडलं आहे हे जनतेला समजत नाही. आम्ही आजही मनात नाही की हा जनतेचा कौल आहे. राज्यात नियम कायदे हे फक्त विरोधी पक्षासाठी आहेत. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदावर दावा कसा असू शकतो हेच समजत नाही. शिवसेना स्वतःला समजणाऱ्यांनी पक्षाचे निर्णय दिल्लीतील नेत्यांना दिले असतील. तर तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार दिल्लीला दिल्यामुळे दिल्ली ठरवेल की राज्य कोणाच्या हाती द्यायचं”, असं संजय राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटातील काही शिवसैनिकांनी आगामी निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. याबाबत संजय राऊतांना विचारण्यात आले. महाविकास आघाडी अजिबात फुटणार नाही. काही कार्यकर्त्यांची वेगळे लढावे अशी भूमिका आहे. लोकसभेला एकत्र लढलो त्याचा फायदा झाला, विधानसभेला का फायदा झाला नाही हे एकत्र बसून ठरवू. भविष्याचा विचार करता आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जे पराभूत झाले आहेत त्यांना असं वाटणं चूक नाही. भविष्यात काय होईल ते बघून घेऊ”, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट!, “बाबा..”

मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; Amit Shah आणि Vinod Tawde यांच्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss