spot_img
spot_img

Latest Posts

गोपीनाथ मुंडेंच्या रुद्राक्ष संदर्भात काय म्हणाल्या पंकजा मुंडे

तब्बल दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. विशेष म्हणजे ब्रेकवरून आल्यावर त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा (ShivaShakti Parikrama) यात्रा सुरू केली. या आठ दिवसांच्या त्यांच्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला.

तब्बल दोन महिन्यांच्या राजकीय ब्रेकनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा सक्रिय झाल्या. विशेष म्हणजे ब्रेकवरून आल्यावर त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा (ShivaShakti Parikrama) यात्रा सुरू केली. या आठ दिवसांच्या त्यांच्या शिव-शक्ती परिक्रमा यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. मात्र, त्यांच्या याच यात्रेदरम्यान एक गोष्ट वेगळी जाणवली आणि सर्वांचेच या गोष्टीने लक्ष वेधले. पंकजा मुंडे यांच्या गाळ्यात त्रिशूलचा लोगो असलेला लॉकेट आणि त्यात असलेला रुद्राक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विशेष म्हणजे हा रुद्राक्ष दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिलेला होता. मात्र, गोपीनाथ मुंडेंचा रुद्राक्ष पंकजांच्या गळ्यात येण्यासाठी १० वर्षांची वाट पाहावी लागली आणि त्याचं देखील एक कारण असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्यात.

दरम्यान आपल्या गळ्यात असलेल्या त्रिशूल आणि रुद्राक्षबाबत बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, “मी स्वतः हा लोगो डिझाईन केला आहे. तसेच पुण्यातील रांका ज्वेलर्स यांच्याकडून हा गळ्यातील लोगो बनवून घेतला असून, खूपच सुंदर आहे. यात एक त्रिशूल आहे, सोबत त्यात त्रीकुंड आहे. त्यात देवीचे डोळे आहेत. सोबत माझ्या वडिलांची आठवण म्हणून यात रुद्राक्ष आहे. पण काही पथ्य असल्याने हा रुद्राक्ष मी घालू शकत नव्हते. मात्र, आता ते पथ्य नसल्याने मी गोपीनाथ मुंडेंचा रुद्राक्ष गळ्यात घालत आहे. पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याने मी राष्ट्रीय भूमिकेत गेले होती. अंत्यत प्रामाणिकपणे मी आपली जबाबदारी निभावत होते. ज्यात मध्य प्रदेशात माझा अधिक वावर होता. पक्षाकडून जसे सांगितले जात होते त्याप्रमाणे माझं काम सुरु होते. पण अशात तुम्ही परत या असा महाराष्ट्रातील लोकांचा रेटा होता. तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे, तुम्ही ईकडे या असे म्हणायचे. पण, माझ्याकडे अशी काही जबाबदारी नाही.

मी सरकारमध्ये नाही किंवा संवैधानिक पदावर नाही. तसेच पक्षाच्या महाराष्ट्राच्या कोअर कमिटीत सुरवातीला काही बैठका सोडल्यास आपल्यावर काही जबाबदारी नसल्याने हस्तक्षेप करणे योग्य नसल्याचे मी कार्यकर्त्यांना सांगत असयाचे. पण लोकं अस्वस्थत झाले होते आणि दोन महिन्याच्या सुट्टीमुळे अस्वस्थता आणखीच वाढली. त्यामुळे अधिक मास आणि त्यात १९ वर्षांनी श्रावण अधिक मास असल्याने मी राज्यातील जागृत देवस्थान आणि इतर देवस्थानी जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणजे शिव-शक्ती परिक्रमा यात्रा असल्याचा पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे ही वाचा: 

स्वतःच्या जीवनावरील चित्रपटाचे पोस्टर जरांगेंच्या हस्ते प्रदर्शित

गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss