महविकास आघाडीमध्ये झालेल्या पराभवानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होताना दिसत आहेत. महायुतीला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता युती मध्ये कोण कोण सामील होणार याबाबत अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विचारले असता, तत्कालीन मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच विधानसभेला युती झाली नाही. असे म्हणण्यात आले आहे. तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक पार पडली. राज्याच्या राजकारणात सध्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना विचारले असता, मी त्यांच्याकडे बघत देखील नाही असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकारेंनी यांनी लावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्तिथीत ही बैठक पार पडण्यात आली. या बैठकीत राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला, विधानसभेला जे झाले ते विसरा व आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात काम करा,असे आदेश देण्यात आले. तर मनसे पदाधिकारी महायुती सोबत युती करण्यास आग्रही आहेत. सदर बैठक सुमारे दिड ते दोन तास मनसे पदाधिकारी व नेते यांच्यात पार पडली. या बैठकीत महायुतीसोबत युती करण्यासंदर्भात Positive चर्चा करण्यात आली. तर महानगरपालिका निवडणुकीसाठी समित्या तयार करण्यात येणार आहेत. सदर समित्या प्रभागातील उमेदवारांचा आढावा घेतील व त्या अनुषंगाने निवडणूकांच नियोजन करण्यात येईल. त्या समित्या जे निर्णय घेतील त्याचा विचार केला जाईल.
मंगळवारी झालेल्या या बैठकीत आगामी महापालिका निवडणुका हाच महत्त्वाचा मुद्दा होता. महापालिका निवडणुकीत मनसे कुणासोबत युती करणार? याबाबत चर्चा झाली. सध्या चर्चेत असलेल्या या मुद्द्याबद्दल अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. याचसंदर्भात शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना मनसे कोणासोबत युती करणार विचारले असता, मी त्यांच्याकडे बघत नाही असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
हे ही वाचा:
अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरी झाली चोरी, हिऱ्यांचा नेकलेस, -रोख रक्कम चोरणाऱ्या आरोपीला केली अटक
HMPV Virus Cases : देशात HMPV विषाणूच्या रुग्णांमध्ये झाली वाढ, 30 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात…