spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

राज्यपाल होणार का विचारलेल्या प्रश्नावर Chhagan Bhujbal यांचे उत्तर म्हणाले…

Chhagan Bhujbal PC: आज पुण्यात Chhagan Bhujbal  यांची प्रकट मुलाखत पार पडली. जाधव इंस्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान बोलताना छगन भुजबळांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ चर्चेत आहेत. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी जाहीर विरोध केल्यानंतर मनोज जरांगे यांच्या संतापाचे कारण भुजबळ ठरले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते पक्षाविरोधात जाहीरपणे वक्तव्य करत आहे. त्याचवेळी आज पुण्यात पार पडलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. मग त्यांना राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर ते जाणार का? असे विचारले असता, यावर भुजबळ यांनी स्पष्टपणे नकार दिला. राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावणे असे आहे.

यानंतर छगन भुजबळांना तुम्हाला राज्यपाल बनवण्यात येणार असल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी फारच थेट भाषेत उत्तर दिले. “Governor बनवणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी काय करु. माझं काम आहे की मी गोरगरिबांसाठी भांडणं. राज्यपाल झाल्यानंतर मी गोरगरिबांसाठी भांडू शकणार आहे का, बोलू शकणार आहे का?” असा सवाल छगन भुजबळांनी केला. मी राज्यपाल पदाचा अपमान करु इच्छित नाही. ते मोठं पद आहे. नाहीतर परत मी राज्यपाल पदाचा अपमान केला असं म्हणतील. राज्यपाल पद घेतलं तर मी भटक्या, विमुक्तांचे आरक्षण आणि सरंक्षण करु शकणार नाही. त्यामुळे मी जसा मोकळा आहे तसा ठीक आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

पुढे, तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा प्रकरणावरून साहेबांनी राजीनामा घेण्याची घाई केली. असे भुजबळ म्हणाले. या प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता तब्बल २१ वर्षांनी छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळाप्रकरणी शरद पवारांवर निशाणा साधला. छगन भुजबळांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माझी काहीच चूक नसताना माझा राजीनामा घेण्यात आला, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. तेलगी प्रकरण दोन-तीन राज्यात होतं, त्यामुळे मी सुप्रीम कोर्टात गेलो. हे प्रकरण सीबीआयकडे घ्या अशी मी मागणी केली. ट्रकभर कागद आणले. त्यात छगन भुजबळ हे नाव कुठेही नव्हतं. तरीदेखील मला उपमुख्यमंत्री म्हणून राजीनामा द्यावा लागला. गृहमंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी माथ्यावर हा तेलगी प्रकरणातील आहे, असा शिक्का बसला होता. मला शरद पवारांना सांगायचं आहे की साहेब राजीनामा घेण्याची घाई तुम्ही केली.

हे ही वाचा :

Sara Ali Khan च्या ‘त्या’ वक्तव्यावर वीर पहारियाची प्रतिक्रिया

मध्यान्ह भोजनात अंडी बंद केल्याने जितेंद्र आव्हाड संतापून अंडी आणि नाचणी सत्त्व घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss